Marathi Rashi Bhavishya : शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात 22 सप्टेंबरपासून दणक्यात झाली आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. यंदा दहा दिवस नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे यंदाची नवरात्री विशेष आहे. .ज्योतिषशास्त्रानुसार, देवी दुर्गेची पाच राशींवर विशेष कृपा असते. दुर्गा माता या पाच राशींच रक्षण करते आणि त्यांना कायमच मार्गदर्शन करत असते. कोणत्या आहेत दुर्गा मातेच्या अत्यंत प्रिय राशी जाणून घेऊया. .वृषभ रास : वृषभ राशी ही माता दुर्गेच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. या लोकांमध्ये जन्मजात नेतृत्वगुण असतात. कठीण परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. या लोकांमध्ये चांगला आत्मविश्वास असतो. या लोकांवर माता दुर्गेची कृपा असते आणि हे लोक आव्हानांना घाबरत नाहीत. उलट त्याचा धैर्याने सामना करतात. .कर्क रास :कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. देवी चंद्राघंटेच्या रूपामध्ये चंद्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही माता दुर्गेची अत्यंत लाडकी रास आहे. देवीच्या कृपेमुळे हे लोक बुद्धिमान, मेहनती आणि जबाबदार असतात. यांचं मन व्यावहारिक असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते योग्य निर्णय घेतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होणे त्यांना आवडते आणि त्यामुळे ते लोकप्रियही होतात. हे लोक मोठ्या अडचणींवर सहज मार्ग काढतात. .सिंह रास : सिंह रास ही देवीची विशेषआवडती रास आहे. हे लोक उत्साही, धाडसी आणि धार्मिक असतात. देवीच्या आशीर्वादामुळे नशिबाची यांना कायम साथ मिळते. संकटाच्या वेळी हे लोक शहाणपणाने वागतात आणि परिस्थिती त्यांच्या बाजूने वळवतात. यांना करिअर आणि व्यवसायात चांगलं यश मिळतं. हे लोक कायम इतरांची मदत करतात. .कन्या रास : या राशीचे लोक धार्मिक कार्यात पुढे असतात. इतरांना मदत करणं यांना आवडतं. माता दुर्गेच्या कृपेमुळे यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या जास्त काळ टिकत नाही. हे अतिशय उत्साही आणि संवेदनशील स्वभावाचे असतात. .धनु रास : धनु राशीचा स्वामी गुरु आहे. गुरु हा ज्ञान आणि धर्माचे प्रतीक आहे. देवी या ज्ञान आणि धर्माची देवता असल्यामुळे ही रास तिची आवडती आहे. या राशीचे लोक प्रत्येक परिस्थितीला तोंड देतात. कुटूंब आणि समाजाचे उत्तम नेतृत्व करतात आणि कठोर परिश्रमाने यश मिळवतात. या लोकांच्या जीवनात देवीच्या कृपेमुळे सतत प्रगती होते आणि यांना मानसन्मान मिळतो. .डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता..TOMORROW HOROSCOPE : 'या' राशींवर होणार पैशांची बरसात ! 24 सप्टेंबरला महालक्ष्मी राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं नशीब .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.