

TODAY HOROSCOPE Dhan Yog Sarvarth Siddhi Yog 20 November 2025
esakal
Astrology Prediction Dhan Yog Sarvarth Siddhi Yog : आज गुरुवार, २० नोव्हेंबर हा दिवस सर्वांसाठी खास आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या, भगवान विष्णूंचे देवता असलेला गुरुवार आणि त्यात भर म्हणून चंद्र-मंगळ-सूर्य-बुध यांच्या खास संयोगाने धनयोग, शशी-आदित्य योग आणि अनुराधा नक्षत्रामुळे सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे
या तिहेरी शुभ योगांमुळे पाच राशींच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. पैसा, मान-सन्मान, अडकलेले काम पूर्ण होणे, कर्ज परत मिळणे आणि कौटुंबिक सुख असे सगळेच लाभ मिळणार आहेत. चला, पाहूया या भाग्यवान राशींना आजपासून नेमके काय मिळणार आहे