esakal | दिनविशेष - ०७ ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?
sakal

बोलून बातमी शोधा

dinvishes

दिनविशेष - ०७ ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पंचांग -

गुरूवार - ७ ऑक्टोबर २०२१, गुरुवार : आश्विन शुद्ध १, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सकाळी ७.०५, चंद्रास्त सायंकाळी ७.११, घटस्थापना, शारदीय नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, चंद्रदर्शन, भारतीय सौर आश्विन १५ शके १९४३.

२००० - साहित्य, संस्कृती व संशोधन या क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या प्रतिष्ठेच्या गौरव वृत्ती पुरस्कारासाठी डॉ. यु. म. पठाण यांची निवड.

२००३ -अलेक्‍सी ऍब्रिकोसोव, अँथनी लेगेट आणि विताली गिंझबर्ग यांना पदार्थविज्ञान शास्त्रातील कार्याबद्दलचे नोबेल पारितोषिक जाहीर.

२००४ - वर्धा येथील गीताई मंदिराचा अमृतमहोत्सवी स्थापना दिवस साजरा. विनोबा भावे यांनी ७ ऑक्‍टोबर १९३० या दिवशी ‘गीता-आई’चे लिखाण सुरू केले होते.

२००४ - ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकेल क्‍लार्क याने भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत पदार्पणात शतक काढले. २३ वर्षांचा क्‍लार्क हा पदार्पणात शतक काढणारा ऑस्ट्रेलियाचा सतरावा फलंदाज ठरला.

२००९ - अमेरिकास्थित डॉ. वेंकटरमण रामकृषणन या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर.

२०१० - अपत्यप्राप्तीच्या आनंदापासून वंचित राहिलेल्या जगभरातील लाखो जोडप्यांसाठी वरदान ठरलेले ‘टेस्ट ट्यूब बेबी’साठीचे तंत्रज्ञान विकसित करणारे ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉबर्ट एडवर्डस यांना वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर. ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’ (आयव्हीएफ) तंत्रज्ञान विकसित करून जगातील पहिल्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’चा जन्म जुलै १९७८मध्ये झाला.

२०१४ - भारतीय वंशाचे अमेरिकेतील प्राध्यापक थॉमस कैलाथ यांची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात विशेष कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पदकासाठी निवड केली. एमआयटीमधून इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्‍टरेट मिळविणारे ते पहिलेच भारतीय ठरले. स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये काम करत असताना त्यांनी अभियांत्रिकी आणि गणितातील माहितीचा सिद्धांत, संपर्कयंत्रणा, लिनियर सिस्टिम, सिग्नल सिस्टिम, प्रोबॅबिलिटी, मॅट्रिक्‍स यांसह अनेक विषयांचे वेगवेगळ्या दृष्टीने संशोधन केले

हेही वाचा: दर्शनासाठी जाताय? अशी आहे नियमांची साखळी; जाणून घ्या...

हेही वाचा: Live : देवळं खुली...दर्शनाचा पहिला मान मंत्र्यांना

loading image
go to top