Tulsi Vivah 2022: तुळशी विवाह साजरा करताना विसरु नका या गोष्टी; संपुर्ण कुटुंबाला प्राप्त होतील आशिर्वाद

Tulsi Vivah 2022
Tulsi Vivah 2022esakal

Tulsi Vivah 2022 : दिवाळीच्या दिपोत्सवानंतर कार्तिक महिन्यातील द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाचा उत्सव साजरा केला जातो. यंदा तुळशी विवाहाचा उत्सव शनिवार (ता. 5 नोव्हेंबर) सुरू होत आहे. प्रत्येक विवाहित स्त्रीने अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी तुळशी विवाह केलाच पाहिजे असे मानले जाते. या उत्सवाच्या पुजेवेळी काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Tulsi Vivah 2022
Tulsi Vivah 2022: तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ?

पुजेच्या वेळी लक्षात ठेवा या गोष्टी

* तुळशी विवाह वेळी तुळशी वृंदावन तसेच तेथील परिसर स्वच्छ करुन तेथे गोमूत्र शिंपडावे.

* पुजा करताना तुळशीला मध यासह लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

* तुळशी वृंदावनात जे शालिग्राम देवता असतील त्यांना तीळ अर्पण करावे.

* तुळशी आणि शालिग्राम यांना दुधात भिजवलेल्या हळदीचा टिळा लावावा.

* पुजेनंतर तुळशीला प्रदक्षिणा करावी. लक्षात ठेवा, रिकाम्या हाताने प्रदक्षिणा करु नका. हातात तांदळाचे दाणे असावे.

Tulsi Vivah 2022
Astro Tips : या सवयींमुळे लोक होतात श्रीमंत आणि राहतात निरोगी

* तुळशी विवाह हा आपल्या घरातील मंगलकार्याप्रमाणेच आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला कुटुंबातील सर्व आप्तेष्ट- बांधव, मित्र परिवार सर्वांना आमंत्रित करावे.

* पुजेनंतर नैवेद्य अर्पण करावा व तो कुटुंबातील सर्व सदस्यांना वितरित करावा.

* असे मानले जाते की, चार महिन्यांच्या मोठ्या निद्रेतून या दिवशी भगवान विष्णूला उठवलं जातं. त्यामुळे पुजा आटोपल्यानंतर सायंकाळी भगवान विष्णंना जागे होण्याचे आवाहन करावे.

* भगवान विष्णूंना जागे करण्यासाठी घंटानाद करावा. यासह काही लोक मंगलवाद्यसुद्धा वाजवतात.

माहिती विवेचन - विजय राजेंद्र जोशी, नाशिक (ज्योतिष अभ्यासक)

Tulsi Vivah 2022
Vastu Tips : तुमच्या घरातल्या पाण्याच्या टाकीची दिशा समाजातली तुमची प्राणप्रतिष्ठा ठरवते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com