आदित्य ठाकरेंना साडेसातीचा फटका?, ज्योतिषतज्ज्ञांनी दिले उत्तर

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच उद्भव ठाकरे यांचे ग्रह प्रतिकूलच आहेत.
uddhav thackeray and aaditya thackeray
uddhav thackeray and aaditya thackeraysakal

उद्धव ठाकरे - २७-०७-१९६०, मुंबई

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच उद्भव ठाकरे यांचे ग्रह प्रतिकूलच आहेत. बाराव्या स्थानात शुक्र व रवी आहेत. गेली दि. २४ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२ वा. ११ मिनिटापासून शनी मकर राशीत आहे. त्या वेळेपासूनच या पत्रिकेत शनीची प्रतिकूलता सुरू झाली आहे. दि. २४ जानेवारी २०२० पासून शनी सहाव्या स्थानात आहे. या शनीची बाराव्या स्थानात दहाव्या स्थानाचा स्वामी शुक्र व प्रथमस्थानाचा झाली. (uddhav thackeray aaditya thackeray astrology bhavishya patrika prediction)

uddhav thackeray and aaditya thackeray
"बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता": बिचुकले

स्वामी रवी यांच्यावर शनीची दृष्टी आहे. यामुळे अधिकाराच्या संदर्भात दि. २४ जानेवारी २०२० पासूनच प्रतिकूलता सुरू झाली. दि. २९ एप्रिल २०२२ ला शनी कुंभ राशीत आला आहे. या सातव्या स्थानातील शनीची मंगळ, प्रथमस्थानातील चंद्रावर दृष्टी आली आहे. त्यामुळे दि. २९ एप्रिल २०२२ अधिक पासून प्रतिकूलता अधिक गडद झाली.

शिवाय दि. १३ एप्रिल २०२२ ला दृष्टांत गुरू मीन राशीत आला आहे. हा गुरू या पत्रिकेत आठव्या स्थानात आला .आहे. त्यामुळे एकाच वेळी शनीची प्रतिकूलता व गुरुची प्रतिकूलता या दोन्ही गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळे सध्याची ही स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. नजिकच्या काळामध् ये गुरु बदलणार नाही. दि. १२ जुलै गेल्या २०२२ ला शनी परत मकर राशीत येणार आहे. तोही प्रतिकूलच राहणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रिकेत सध्या तर ग्रहमान प्रतिकूलच राहणार

uddhav thackeray and aaditya thackeray
एकनाथ शिंदेंचे ठाकरे सरकारला तीन प्रस्ताव, आमदार वर्षाकडे रवाना

आदित्य ठाकरे - १३-०६-१९९०, मुंबई

सामान्यत: गेल्या चार वर्षांपासून आदित्य ठाकरे यांना शनीची साडेसाती सुरू आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यापासून आदित्य ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिकूलता निर्माण झाली आहे. जन्मतःच साडेसाती आहे. दि. २४ जानेवारी २०२० पासून

चौथ्या स्थानात जो शनी आला आहे त्याची सहाव्या स्थानातील मंगळावरही दृष्टी आहे. त्याच्यामुळे एकाच वेळी शनी व मंगळ हे दोन्ही प्रतिकूल झाले. लग्न कुंडलीत सध्या गुरू सहाव्या स्थानात आहे. त्यामुळे गुरुचीही प्रतिकूलता आहे. शनीची साडेसाती २९ मार्च २०२५ पर्यंत राहणार आहे. या ग्रहस्थितीमुळे महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून श्री. आदित्य ठाकरे यांच्या पत्रिकेत प्रतिकूलता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या तरी नजिकच्या काळात अनुकूलता निर्माण होणे अवघड आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com