Vaishakh Month 2023 : वैशाखचा पवित्र महिना सुरु झालाय, हे खास उपाय केल्यास महिनाभर होईल लाभ

ज्योतिष शास्त्रामध्ये वैशाख महिन्याशी संबंधित काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो
Vaishakh Month 2023
Vaishakh Month 2023 esakal

Vaishakh Month 2023 : हिंदू कॅलेंडरनुसार वर्षाचा दुसरा महिना वैशाख महिना ७ एप्रिलपासून म्हणजेच कालपासून सुरू झाला आहे. या पवित्र महिन्यात भगवान श्री हरीची पूजा केली जाते. या महिन्यात स्नान, दान, जप, तपश्चर्या इत्यादी केल्याने साधकाला विशेष फळ मिळते, असे सांगितले जाते. एवढेच नाही तर जीवनात येणाऱ्या अडचणीही दूर होतात. ज्योतिष शास्त्रामध्ये वैशाख महिन्याशी संबंधित काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो. वैशाख महिन्यात कोणते उपाय केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया.

वैशाख महिन्यात करा हे खास उपाय

धार्मिक ग्रंथानुसार या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या महिन्यात ‘ओम माधवाय नमः’ मंत्राचा नियमित 11 वेळा जप केला पाहिजे, असे सांगितले जाते. हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

असे मानले जाते की या महिन्यात पाणी, गूळ, सातू, तीळ इत्यादी गरजू लोकांना दान केल्याने साधकाला विशेष फळ मिळते. एवढेच नाही तर पितृदोषापासून मुक्ती मिळते. आणि त्या व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात.

Vaishakh Month 2023
Dream Astrology : स्वप्नात नवरी, अप्सरा किंवा अभिनेत्री दिसण्याचे काय असतात संकेत? स्वप्न शास्त्र सांगते...

या महिन्यात अति उष्णतेमुळे काही विशेष गोष्टींचे दान करणे लाभदायक ठरते. या महिन्यात गरजू लोकांना छत्री, चप्पल, पाण्याच्या बाटल्या इत्यादी दान करणे आणि पशु-पक्ष्यांना पाणी व अन्न दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने माणसाला एक हजार राजसूर्य यज्ञाइतके फळ मिळते. असे म्हणतात की या महिन्यात सावलीचे झाड लावल्याने माणसाच्या जीवनात आनंद येतो. (Hindu Religion)

Vaishakh Month 2023
Astrology : वाटेत पैसे सापडणे शुभ की अशुभ? हे पैसे उचलावेत की नाही वाचा सविस्तर

हिंदू धर्मग्रंथांमध्ये वैशाख महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला गेला आहे. याच महिन्यात अक्षय्य तृतीया सणही साजरा केला जातो. अशा स्थितीत या महिन्यात सोने-चांदीसारख्या शुभ वस्तूंची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. (Astrology)

डिस्क्लेमर - वरील लेख ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com