Vastu Tips For Tulsi: सकाळी तुळशीला पाणी घालताना म्हणा 'हे' मंत्र, तुमच्या घरात होईल भरभराट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vastu Tips For Tulsi

Vastu Tips For Tulsi: सकाळी तुळशीला पाणी घालताना म्हणा 'हे' मंत्र, तुमच्या घरात होईल भरभराट...

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूपच महत्व आहे. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात, की भगवान विष्णुंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पांनांशिवाय भगवान विष्णुंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही. असे मानले जाते, की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते. तुम्हाला हे माहीत आहे का, तुळशीला पाणी घालताना एका मंत्राचे पठन करायचे असते? हा मंत्र कोणता आहे याचीच सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

● धार्मिक ग्रंथांनुसार जर तुळशीला पाणी घालताना ‘ॐ-ॐ’ ह्या मंत्राचे ११ किंवा २१ वेळा जप केला, तर वाईट नजरेपासून बचाव होतो. त्याचबरोबर, घरात धन व धान्य यांची वृद्धि होते.

● विष्णु भगवानच्या पूजेला तुळशीची पाने अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने तोडतांना

"ॐ सुभद्राय नम:, मातस्तुलसि गोविन्द हृदयानन्द कारिणी,नारायणस्य पूजार्थं चिनोमि त्वां नमोस्तुते।

या मंत्राचा जप करावा. यामुळे पूजेचा दुहेरी फायदा मिळतो.

● जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी

महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।

या मंत्राचा जप करावा.

● जर कोणाला वाईट नजर लागली असेल, तर त्याच्या डोक्याकडून पायापर्यंत 7 तुळशीची पाने आणि 7 काळी मिरीचे दाणे 21 वेळा उतरवून घ्या आणि ते नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून द्या. त्यामुळे, वाईट नजरेपासुन बचाव होईल.

● आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे. तुळशीची पुजा करताना शुद्ध देशी तुपाचा दिवा जरूर लावा, त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरात समृद्धि येईल.

● हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे. असे म्हणतात की भगवान विष्णूचे अवतार श्री कृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले. तुळशीच्या पानांशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही. भगवान विष्णुंना तुळशीचे पाणी घालताना त्यात चन्दन मिसळा, त्यामुळे भगवान विष्णु प्रसन्न होतील आणि घरात समृद्धि येईल.

आता तुळशीचे काही नियम पाहू या..

तुळशीचे काही नियम आहेत. त्याचे पालन करणे बंधनकारक असते. त्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशिर्वाद तुम्हाला कायम लाभेल. म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपाबाबत पुढील चुका करू नका.

● तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका. येत्या सोमवारी एकादशी असल्याने हे दोन्ही दिवस सलग येत आहेत. त्यामुळे दोन दिवसात तुळशीचे रोप मान टाकणार नाही, अशा बेताने ठिबक सिंचन सदृश सोय करून ठेवावी.

● या दिवशी पाणी न घालण्याचे कारण या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते, उपास करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रतभंग होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे.

● तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते. आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे. मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे. परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते. म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे.

टॅग्स :cultureshravanvastu tips