Vastu Tips : मेहनत करताय पण व्यवसायात यश नाही; ही असतील कारणं

दक्षिण दिशेला दरवाजा असलेल्या दुकानात आग्नेय आणि उत्तर-पूर्व दिशेला तोंड करून बसावे
Vastu Tips
Vastu Tipsesakal

पुणे : व्यवसाय असो वा नोकरी प्रत्येकजण त्यासाठी झटतो. जास्त मेहनत करून जास्त नफा मिळवण्यासाठी उपाय करत असतो. पण, तरीही गणित कुठेतरी चुकत असतं. नक्की काय घडतंय, आपण कुठे चुकत आहोत हे समजत नाही. एखाद्याकडे सल्ला मागितला तर तो व्यक्ती सल्ला देतो पण त्यामुळे फरक पडेलच असे नाही. त्यामुळे वास्तूशास्त्र नेमकं काय सांगतंय हे पाहुयात.

Vastu Tips
Vastu Tips : आर्थिक त्रासाला कंटाळले आहात? शनिवारी सुपारीचे 'हे' सोपे उपाय करा

तूमचे एखादे छोटे दुकान असो वा भव्य शोरूम खरेदीला आल्यावर तिथे ग्राहकाने जास्त वेळ थांबयला पाहिजे. त्यासाठी दुकान स्वच्छ ठेवणे, ते सजवणे, या गोष्टी करायला हव्यात. तूमचा हॉटेल व्यवसाय असेल तर सजावटीकडे खास लक्ष द्यावे. हॉटेलमधील भिंती, त्यावरील विशिष्ट चित्रे, वेगवेगळी झाडे ठेवावीत.

Vastu Tips
Vastu Tips : घरातला चुकीच्या जागेवरचा टीव्ही पटकन उचला; त्याआधी कारण वाचा

दुकानाचे बांधकाम सुरू असताना किंवा ते खरेदी करत असताना दुकानाच्या पूर्वेकडे मुख्य दरवाजा येईल असे घ्यावे. फरशी पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे बसवलेली असावी.दुकानात बसताना मालकाने अग्नेय कोपऱ्यात उत्तरेला तोंड करून बसावे. पैशांचा गल्ला नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावा.

Vastu Tips
Vastu Tips: शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जायचं आहे? या वास्तू टिप्सचा अवलंब करा

मालकाने बसण्यासाठी टेबल किंवा खुर्चीचा वापर करावा. मालकाने उत्तर-पूर्व किंवा पश्चिम-उत्तर बसू नये. शक्य असल्यास आग्नेय दिशेला म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेला केबिन ठेवून पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसता येते. दक्षिण दिशेला दरवाजा असलेल्या दुकानात आग्नेय आणि उत्तर-पूर्व दिशेला तोंड करून बसावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com