
Astrological Predictions for Love, Career and Money August 2025: 21 ऑगस्ट रोजी शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत गोचर करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा प्रेम, सौंदर्य, कला, ऐश्वर्य आणि आकर्षण यांचा अधिपती मानला जातो. जेव्हा शुक्र आपली स्थिती बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम सगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो.
या वेळी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा त्याचा परिणाम काही राशींवर सुखद तर काही राशींवर दुःखद होणार आहे. या गोचरामुळे काहींना प्रेम, नात्यांमध्ये आनंद, आर्थिक उन्नती, करिअरमध्ये प्रगती आणि व्यावसायिक विस्ताराचे योग्य जुळून येतील. मात्र काही काही राशींना आरोग्य, विशेषतः पाणी आणि छातीसंबंधी आजार, मानसिक संतुलन राखणे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. चला तर मग पाहूया, शुक्र राशीचा कर्क राशीत प्रवेश कोणासाठी कसा लाभदायक ठरेल.