Vivah Muhurta 2023 : विवाह मुहूर्तासाठी आता नोव्हेंबरची प्रतीक्षा; 'या' कारणामुळं मुहूर्तच नाहीत!

मुहूर्त नसल्याने गजबजणाऱ्या विवाह (Marriage) मंगल कार्यालयाच्या परिसरात शुकशुकाट जाणवत आहे.
Marriage Ceremony Vivah Muhurat 2023
Marriage Ceremony Vivah Muhurat 2023esakal
Summary

गेल्या मे महिन्यात विवाह मुहूर्त होते. मेनंतर आगामी महिन्यात मुहूर्त नसल्याने वधू-वर पालकांची घाईगडबड झाली.

ओगलेवाडी : जून ते नोव्हेंबर या महिन्यात चातुर्मासामुळे (Chaturmas) विवाह व उपनयन मुहूर्त नाहीत, तरी अपवादाने अडचणीमुळे व गरजेने चातुर्मासातील गौण काळ मुहूर्त शोधावा लागत आहे.

मुहूर्त नसल्याने गजबजणाऱ्या विवाह (Marriage) मंगल कार्यालयाच्या परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. मंगल कार्यालये ओस पडत आहेत. विवाह आनुषंगिक व्यवसायही काही दिवसांपासून ठप्प आहेत. त्यांच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. व्यावसायिकांना नोव्हेंबरनंतरच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Marriage Ceremony Vivah Muhurat 2023
Nana Patole : 'फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जे पाप घडलंय, त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील'

गेल्या मे महिन्यात विवाह मुहूर्त होते. मेनंतर आगामी महिन्यात मुहूर्त नसल्याने वधू-वर पालकांची घाईगडबड झाली. तेव्हा मंगल कार्यालये उपलब्ध नसल्याने काही विवाह हे शाळा व मंदिर परिसरात उरकावे लागले. या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने लोकांची धावपळ उडाली.

Marriage Ceremony Vivah Muhurat 2023
Radhanagari : हसन मुश्रीफांचा 'दोस्त' कोणाला साथ देणार? साहेब की दादा, 'केपीं'च्या राजकीय भूमिकेकडं लक्ष्य

दैनंदिन जीवन विस्कळित झाले. त्याचा फटका मंगल कार्यालयांनाही बसला. त्यांची कार्यालयाची दुरुस्ती व स्वच्छतेची कामे सध्या सुरू आहेत. व्यवसाय सध्या बंद असला तरी दैनंदिन खर्च व कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आचारी काम करणारे व धार्मिक विधी करणारे किरकोळ कामांच्या शोधात आहेत.

कापड, किराणा व सराफ बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीची वर्दळ बेताची आहे. सोने भावात काहीशी घसरण होऊनही ग्राहक बेताची खरेदी करत आहेत. भाजी मंडईत भाज्यांचा उठाव कमी आहे. लग्नाअभावी कांदा, बटाटा, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी यांची मागणी घटली आहे.

Marriage Ceremony Vivah Muhurat 2023
Siddheshwar Factory : चिमणीच्या पाडकामानंतरही विमानाचं उड्डाण अवघड; 62 एकराचा वाद, 105 अडथळे

विवाह मुहूर्त नसल्याने कामे नाहीत. तथापि, वादक कलाकारांना पथकात टिकवून ठेवण्यास त्यांना अंगावर उचल द्यावी लागत आहे.

जाधव बंधू, बँड व्यावसायिक, हजारमाची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com