
नागपंचमीला धारदार वस्तूंचा वापर अशुभ मानला जातो.
या दिवशी सापाच्या पूजेला धार्मिक महत्त्व आहे.
सर्पांशी संबंधित पौराणिक कथा सणाच्या मागे कारणीभूत आहेत.
श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच पवित्रता निर्माण होते. हा महिना भगवान शंकराला समर्पित मानला जातो. आणि महादेवांचे एक अत्यंत प्रिय प्रतीक म्हणजे नाग. त्यामुळेच या महिन्यात येणाऱ्या नागपंचमी या सणाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं आहे. यंदा २९ जुलैला मंगळवारच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाणार आहे.
नागपंचमीला हिंदू धर्मात फार महत्त्व दिले जाते. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते. काही ठिकाणी मातीपासून किंवा चंदनाने नागाचे चित्र काढून त्याची विधिपूर्वक पूजा केली जाते. पुराणकथेनुसार, श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीत राहणाऱ्या दुष्ट कालिया नागाचा पराभव केला होता, आणि त्यानंतर यमुना नदी पुन्हा निर्मळ झाली. हाच दिवस ‘नागपंचमी’ म्हणून साजरा केला जातो.
तसेच, शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही साप एक मित्र मानला जातो, कारण तो शेतीला नुकसान करणाऱ्या उंदरांचा नाश करतो. त्यामुळे या दिवशी सापांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे ही केवळ परंपरा नाही, तर निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा एक भावनिक प्रयत्न आहे.
नागपंचमीला काही विशिष्ट वस्तूंचा वापर न करण्याची प्रथा आहे. उदा. तवा, चाकू, कढई, सुई इत्यादी धारदार आणि लोखंडी वस्तू. या मागे धार्मिक श्रद्धा आणि पौराणिक कथा दोन्ही आहेत.
लोकमान्यतेनुसार, चपाती बनवताना वापरला जाणारा लोखंडी तवा हा सापाच्या फण्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्या दिवशी तव्यावर काही शिजवले गेले तर त्याने सापाला त्रास होऊ शकतो, अशी समजूत आहे.
तसेच या दिवशी कढईत अन्न शिजवणे, चाकूने भाजी कापणे, सुई वापरणे किंवा जमिनीची खणखण करणे हे सर्व टाळले जाते. कारण सापाचे बिळ जमिनीखाली असते आणि त्या दिवशी जमिनीचे खणणे म्हणजे सापाच्या वास्तव्याला बाधा देणे, अशी मान्यता आहे.
एक जुनी पौराणिक कथा सांगते की, एक शेतकरी नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ चुकून नागाच्या बिळात गेला आणि नागाची काही पिल्लं मृत्युमुखी पडली. बाहेरून आलेल्या नागीणीनं हे पाहून क्रोधाने त्या शेतकऱ्याचा, त्याच्या पत्नीचा आणि मुलांचाही जीव घेतला.
या शेतकऱ्याची एक विवाहित मुलगी दुसऱ्या गावी राहत होती. नागीण तिच्याकडेही दंश करण्यासाठी पोहोचली. मात्र त्यावेळी ती मुलगी नागदेवतेची पूजा करत होती. तिने चंदनाने तयार केलेल्या नागाच्या चित्राची मनोभावे पूजा करून दूधलाह्यांचा नैवेद्य अर्पण केला. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन नागीणीनं केवळ तिचा जीव वाचवला नाही तर तिचे आई-वडील आणि भावंडांनाही पुन्हा जिवंत केलं.
नागपंचमीच्या दिवशी अनंत (शेषनाग), वासुकी, पद्मनाभ, कंबळ, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या आठ नागांची विशेष पूजा केली जाते. या नागांना पूजल्याने संकट टळतात, सर्पदोष दूर होतो आणि परिवारात सुख-समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे.
Why is a pan (tava) not used on Nag Panchami?
तवा सापाच्या फण्याचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे त्या दिवशी त्याचा वापर टाळला जातो.
What is the significance of Nag Panchami?
नागपंचमी हा सर्पपूजेचा दिवस असून तो भगवान शंकर व सर्पदेवतेशी संबंधित आहे.
Can we dig the ground on Nag Panchami?
नाही, कारण जमिनीत सापाची बिळं असतात आणि ती बाधित होऊ शकतात.
Which snakes are worshipped on Nag Panchami?
अनंत, वासुकी, पद्मनाभ, कंबळ, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया यांची पूजा केली जाते.
What food should be avoided on Nag Panchami?
कढईत शिजवलेले अन्न, चिरलेली भाजी, पोळी-चपाती बनवणे वर्ज्य मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.