
June 2025 Horoscope: या आठवड्याचे साप्ताहिक राशीफळ चंद्र, मंगळ आणि बुध ग्रहाच्या संक्रमणाने प्रभावित होणार आहे. या आठवड्यात बुध मिथुन राशीत भद्रा राजयोग निर्माण करणार आहे. तसेच तर चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे आणि गुरु आणि शुक्रासह नवम पंचम आणि संसप्तक योग निर्माण करणार आहे. या आठवड्यात गुरु आणि चंद्र एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या घरात असल्याने गजकेसरी योग निर्माण करतील. अशावेळी या आठवड्यात कोणत्या राशींना आर्थिक लाभ होणार हे जाणून घेऊया.