अरे वाह..! दोन वर्षाच्या चिमुकल्यासाठी भारतीय रेल्वेने दाखवली तत्परता...

वृत्तसंस्था
Thursday, 30 April 2020

लॉकडाऊनमुळे ते अशक्य दिसत होते, पण मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या समन्वयामुळे हे 28 तासांची मोहीम यशस्वी होऊ शकली. 

मुंबई : सिकंदराबाद येथील दोन वर्षाच्या बाळाला औषध म्हणून उंटीणीचे दूध द्यायचे होते. ते दूध मिळणार होते केवळ राजस्थानहून.. मात्र, लॉकडाऊनमुळे ते अशक्य दिसत होते, पण मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या समन्वयामुळे हे 28 तासांची मोहीम यशस्वी होऊ शकली. 

मोठी बातमी ः मुंबईला दिलासा नाहीच; कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच...

तेलंगणातील सिकंदराबाद येथील दोन वर्ष बाळाला स्वमग्नतेचा आजार आहे. त्यावर उंटीणीचे दूध हे प्रभावी औषध म्हणून दिले जाते. ते दूध मिळते ते राजस्थानमध्येच. बाळाची प्रकृती लक्षात घेता उंटीणीच्या दुधासाठी राजस्थानमधील फालना येथून सुटणाऱ्या मालवाहू रेल्वेतून उंटीणीचे दूध आणण्यासाठी मागणी नोंदवण्यात आली. हे दूध मुंबईपर्यंत पश्चिम रेल्वेने येण्यापर्यंत कोणताही प्रश्न नव्हता. मात्र पुढे हे दूध मुंबईहून सिंकदराबादला नेण्याचीही गरज होती. त्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेने एकमेकांच्या समन्वयातून दूध बाळापर्यंत यशस्वीपणे पोहोचते केले.

मोठी बातमी ः ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा जोर वाढला; वाचा आजची आकडेवारी

नियोजनानुसार उंटीणीचे दूध फालना येथून लुधियाना - वांद्रे टर्मिनस या मालवाहू रेल्वेने मुंबईपर्यंत पाठवण्याचे ठरले. त्यानंतरचा प्रवास होता त्याच दिवशी दुपारी सुटणाऱ्या मुंबई-सिकंदराबाद मालवाहू पार्सल रेल्वेचा. त्यासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी उंटीणीचे दूध वांद्रे येथे पोहोचल्यावर ते तातडीने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचवण्याची व्यवस्थाही केली. मुंबई - सिकंदराबाद पार्सल रेल्वे निघाल्यावर या खास पार्सलबाबत सिकंदराबाद स्टेशनला कल्पना दिली. त्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यामुळे हे उंटीणीचे दूध लॉकडाऊनमध्येही दोन वर्षाच्या बाळाला मिळू शकले.

मोठी बातमी ः मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय.. सील केलेल्या वस्त्यांची संख्या पुन्हा वाढली...

आपात्कालीन परिस्थितीत रेल्वेने मदत केल्याचे हे एकमेव उदाहरण नाही. विक्रोळीहून चिपळूणला औषध पाठवताना रेल्वेने माणूसकी दाखवली. विक्रोळीतील मुलाला चिपळूणला रहात असलेल्या वडिलांना औषध पाठवायचे होते. रेल्वे आधिकाऱ्यांनी ओखा - एर्नाकुलम पार्सल रेल्वेने हे औषध पाठवले. त्यासाठी या रेल्वेला चिपळूणला वेळापत्रकात नसलेला थांबाही देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indians railway carries camel milk for autism cgild from rajasthan to secunderabad