शिवसेना खासदारांच्या राज्यसभेत जागा बदलल्या; महाशिवआघाडीचे दिल्लीत पडसाद

टीम ई-सकाळ
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर आता त्याचे दिल्लीतही पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडली आहे. त्यामुळे संसदेतची त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाशिवआघाडीची राज्यपालांसोबतची भेट पुढे ढकलली

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर आता त्याचे दिल्लीतही पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडली आहे. त्यामुळे संसदेतची त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाशिवआघाडीची राज्यपालांसोबतची भेट पुढे ढकलली

संसदेच्या सभागृहांमध्ये पडसाद 
महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं वेगळं राजकीय समीकरण उदयाला आलं आहे. भाजपचं सर्वांत जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपदावरून फाटल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबतीनं सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामाही दिला. या सगळ्याचे पडसाद आता संसदेच्या सभागृहांमध्ये उमटताना दिसत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते पहिल्यांदाच दिसणार शिवाजी पार्कवर

काळ्या पैशांबाबत लवकरच होणार 'ही' घोषणा

'भाजपला कर्माची फळं भोगावी लागतील'
राज्यसभेतील शिवसेना खासदारांच्या जागा बदलण्यात आल्या आहेत. भाजप सूड बुद्धीने हे सगळं करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची निर्मिती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली. पण, त्यांच्या शिवसेनेलाच बाजूला ठेवण्यात आलंय. शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण, सेना संपणार नाही. भाजपला कर्माची फळं भोगावी लागतील, अशी प्रतिक्रिया विनायक राऊतांनी भाजपवर केलीय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena leader reaction after seat change in rajya sabha