डिप्रेशन झालंय नॉर्मल; ज्येष्ठ नागरिक विळख्यात 

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

ज्येष्ठ नागरिक विळख्यात 
राज्यनिहाय विचार करता दक्षिणेकडील राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक असून, त्यातही महिला या विकाराने अधिक प्रमाणात ग्रस्त आहेत. भारतातील वयोवृद्ध नागरिकांमध्ये नैराश्‍याचे प्रमाण वाढत आहे. तसेच, नैराश्‍यामुळे आत्महत्या करण्याची वृत्तीही बळावत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे हे विकार होऊ नये म्हणून परिणामकारक उपाय करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. 

नवी दिल्ली : प्रत्येक सात भारतीयांमागे एका व्यक्तीला मानसिक विकार जडला असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले असून, यामुळे नैराश्‍य आणि चिंता या सर्वसामान्य गोष्टी झाल्या असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. ही आकडेवारी 2017 मधील आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मानसिक विकारांबाबतची राज्यनिहाय नोंद "लॅन्सेट सायकीयाट्री' या नियतकालिकामध्ये 1990 पासून घेण्यात येत आहे. 1990 ते 2017 या काळात एकूण विकारांमध्ये मानसिक विकारांचे असलेले प्रमाण दुप्पट झाले असल्याचे या नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. या मानसिक विकारांमध्ये नैराश्‍य, अतिचिंता, स्किझोफ्रेनिया, दुभंगलेले व्यक्तिमत्त्व, स्वभावातील टोकाचे बदल, आत्ममग्नता यांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला कॉंग्रेसचे "ग्रहण'..! 

2017 मध्ये, भारतातील 19 कोटी 70 लाख जण मानसिक विकारग्रस्त होते, त्यापैकी चार कोटी 60 लाख जणांना नैराश्‍य, तर साडेचार कोटी जणांना अतिचिंतेने ग्रासले होते. हे दोन्ही अत्यंत सर्वसामान्य विकार झाले असून, तो होण्याचे प्रमाणही वाढत आहे. 

ज्येष्ठ नागरिक विळख्यात 
राज्यनिहाय विचार करता दक्षिणेकडील राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक असून, त्यातही महिला या विकाराने अधिक प्रमाणात ग्रस्त आहेत. भारतातील वयोवृद्ध नागरिकांमध्ये नैराश्‍याचे प्रमाण वाढत आहे. तसेच, नैराश्‍यामुळे आत्महत्या करण्याची वृत्तीही बळावत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे हे विकार होऊ नये म्हणून परिणामकारक उपाय करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. 

अपघातात 2.2 लाख जणांचा मृत्यू 
"लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारतात 2017 मध्ये रस्ते अपघातात दोन लाख वीस हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुरुषांचा कमी वयातच होणाऱ्या मृत्यूमध्ये रस्ते अपघात हे सर्वांत मोठे कारण आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांची संख्या निम्मी आहे. हे प्रमाण जागतिक आकडेवारीच्या तुलनेत अधिक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 in 7 Indians suffered from mental disorders depression Indians top the list

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: