esakal | आतापर्यंत किती लशींचा देशात पुरवठा झाला? आरोग्य मंत्रालयाने दिलं उत्तर

बोलून बातमी शोधा

vaccine

देशभरात कोविड प्रतिबंधक लसीची ओरड सुरू असताना देशात आतापर्यंत दहा कोटी लसीचे डोस वितरित करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

आतापर्यंत किती लशींचा देशात पुरवठा झाला? आरोग्य मंत्रालयाने दिलं उत्तर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशभरात कोविड प्रतिबंधक लसीची ओरड सुरू असताना देशात आतापर्यंत दहा कोटी लसीचे डोस वितरित करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. गेल्या २४ तासांत ३५ लाख डोस देण्यात आले असून, लस पुरवठ्यात इतर देशांच्या तुलनेत भारत अग्रक्रमावर असल्याचा दावा या मंत्रालयाने केला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्र सरकार इतर देशांना लस निर्यात करीत असल्याने कॉंग्रेस, आम आदमी पार्टी त्यावर टीकेची झोड उठविली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने दहा कोटी लस वितरित झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात नवे रुग्ण वाढत असून, गेल्या चोविस तासांत एक लाख ५२ हजार ८७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तमीळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये कोरोनो रुग्णांची संख्या वाढतच आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ५५ हजार ४११, छत्तीसगड १४ हजार ९८ आणि उत्तर प्रदेशात १४ हजार ७४८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

VIDEO: 'कोरोना देशातून निघून जा'; मंत्र्याने एअरपोर्टवर केली पूजा

महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळ या पाच राज्यांमध्ये देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येपैकी ७०.८२ टक्के सक्रीय रुग्ण आहेत. एकट्या महाराष्ट्रातील सक्रीय रुग्ण संख्या ही एकूण रुग्णांच्या ४८.५७ टक्के आहे. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही महाराष्ट्रात अधिक आहे, असे निरीक्षण आरोग्य मंत्रालयाने नोंदविले आहे. 

व्हॅक्सिन घेऊनही झाला कोरोना; गायक पलाश सेनची पोस्ट व्हायरल 

नागरिकांचा हक्क हिरावू नका! 

देशातील प्रत्येक नागरिकाचा लसीकरणाचा हक्क केंद्र सरकारने हिरावू नये. केंद्र राजनैतिक फायद्यासाठी अन्य देशांना लस निर्यात करीत आहे. यामुळे देशातील नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे प्रथम देशातील नागरिकांचे लसीकरण करावे. तसेच लसीकरणासाठी घातलेली वयाची मर्यादा रद्द करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने पंतप्रधांनाकडे केली आहे. या पक्षाचे आमदार राघव चढ्ढा यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.