१० वर्षीय मुंबईकर ऱ्हिदमची एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत मजल

प्राणवायूची कमतरता आणि पायांना आलेले फोड तिला थांबवू शकले नाहीत.
rhythm
rhythmgoogle

मुंबई : वरळीतील १० वर्षीय स्केटर र्‍हिदम ममानिया ही नेपाळच्या हिमालयीन रांगांमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारी सर्वांत तरूण भारतीय गिर्यारोहक बनली आहे. र्‍हिदमने कोणत्याही प्रकारचे अधिकृत प्रशिक्षण घेतलेले नाही.

rhythm
गिर्यारोहण करताना... काळजी हीच गुरुकिल्ली

५३६४ मीटर उंचीवरील प्राणवायूची नीचांकी पातळी, त्यामुळे होणारी मळमळ आणि पायांना आलेले फोड या गोष्टी ध्येयवादी र्‍हिदमला थांबवू शकल्या नाहीत. वांद्र्याच्या मेट ऋषिकुल विद्यालयाच्या पाचव्या इयत्तेत शिकणार्‍या र्‍हिदमने ६ मे या दिवशी दुपारी १ वाजता तिचे पालक ऊर्मी आणि हर्षल यांच्यासोबत एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला."एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणे हे माझे ध्येय होते. त्यामुळे मी थंड वातावरणाची पर्वा केली नाही", असे र्‍हिदम म्हणाली.

rhythm
गिर्यारोहण प्रशिक्षण अभ्यासक्रम

"ऱ्हिदम ही राष्ट्रीय स्तरावरील स्केटर आहे. त्यामुळे तिचे मांडीचे स्नायू बळकट आहेतच; पण तिची इच्छाशक्ती आणि विवेकबुद्धी दखल घेण्याजोगी आहे. इतर गिर्यारोहक खाली उतरण्यासाठी हेलिकॉप्टरची वाट पाहात असताना ऱ्हिदमने मात्र पायीच उतरण्याचा निर्णय घेतला. तिने स्वत:चा सर्व कचरा तिथेच टाकण्याऐवजी काठमांडूने आणला. "

नेपाळच्या सातोरी अॅडव्हेंचर्सचे ऋषी भंडारी यांनी ही ११ दिवसांची मोहीम आयोजित केली होती. "मोहीमेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाच्या वयाची आणि राष्ट्रीयत्वाची नोंद माझ्याकडे नाही. पण बहुतांशी गिर्यारोहक भारतीय आणि विशेषकरून मुंबईचे होते. आरोग्यबाबत कोणतीही तक्रार न करता ऱ्हिदमने मोहीम पूर्ण केली याचे मला कौतुक वाटते", ऋषी म्हणाले.

rhythm
गिर्यारोहण दिन विशेष : आफ्रिकेच्या किलीमांजारोवर तिरंगा फडकला

ऱ्हिदमच्या कुटुंबाने मनिष सावला यांच्या कच्छ ट्रेकर्स ग्रुपसोबत मोहीम पूर्ण केली. "ऱ्हिदमची कामगिरी अभिमानास्पद आहे. तिने कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही आणि यापूर्वी फक्त एक दिवसाची सह्याद्री मोहीम सर केली आहे. अधिकृत प्रशिक्षण घेऊन ऱ्हिदम एव्हरेस्टचे शिखरही सर करू शकते", असा विश्वास सावला यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com