100 percent ethanol car
esakal
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. ऑक्टोबरमध्ये १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या कारच्या वापराचा खर्च जवळपास २५ रुपये प्रतिलिटर पेट्रोलच्या दराने कार चालवण्याइतका असेल, असं त्यांनी सांगितलं. टोयोटाच्या इनोव्हा फ्लेक्स-फ्यूल कारच्या लॉन्चसाठी आपल्याला ऑक्टोबरमध्ये बोलावण्यात आलं असल्याचंही ते म्हणाले.