esakal | स्वांतत्र्याच्या शंभरीत भारत अमेरिका-चीनच्या बरोबरीनं उभा असेल - मुकेश अंबानी
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani

स्वातंत्र्याच्या शंभरीत भारत अमेरिका-चीनच्या बरोबरीनं उभा असेल - अंबानी

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : भारताच्या आर्थिक उदारीकरणाला सुरुवात होऊन सुमारे तीस वर्षे झाली. १९९१ मध्ये सुरुवात झालेल्या आर्थिक उदारीकरणामुळं देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक बदल झाले आहेत. यानिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलंय की, "जेव्हा आपण स्वातंत्र्याची शंभरी साजरी करत असू तेव्हा भारत अमेरिका चीनच्या बरोबरीनं उभा असेल", एका लेखामधून त्यांनी आपले विचार मांडले आहेत. (100 year of independence India will be with US China Mukesh Ambani aau85)

हेही वाचा: Corona Update: राज्यात अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये लिहिलेल्या या लेखात मुकेश अंबानींनी म्हटलं की, "भारत १९९१ मध्ये छोटी अर्थव्यवस्था होता, त्यानंतर २०२१ मध्ये मोठ्या अर्थव्यवस्थेत बदलला. आता भारताला २०५१ पर्यंत सर्वांसाठी समान समृद्ध असलेल्या अर्थव्यवस्थेत बदलायचं आहे.

हेही वाचा: JEE 2021: पूरस्थितीमुळं परीक्षेला मुकलेल्यांना मिळणार पुन्हा संधी

अंबानी म्हणतात, "त्यांचे वडील धीरुभाई अंबानी हे आर्थिक उदारीकरणाच्या बाजूने होते. १९८०च्या दशकात ते आर्थिक उदारिकरणाला सुरुवातीला पाठिंबा देणाऱ्यांपैकी एक होते. त्याचं माननं होतं की, छोटा विचार करणं हे भारतीयांसाठी अशोभनीय आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं की, गेल्या तीन दशकांत आम्ही अनेक उंची गाठताना मोठी स्वप्न पाहण्याचा अधिकार मिळवला आहे. आपल्या लेखात अंबानी यांनी हा भरवसा देखील व्यक्त केलाय की, स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होताना २०४७ मध्ये भारत अमेरिका आणि चीनच्या बरोबरीनं उभा राहू शकतो तसेच तीन श्रीमंत देशांमध्ये सहभागी होऊ शकतो"

हेही वाचा: दोन डोसवर थांबता येणार नाही; बुस्टर डोसची गरज भासणार : AIIMS

१९९१च्या सुरुवातीला सुरु झालेल्या आर्थिक उदारीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालंय़. यामुळे लायसन्स राज संपुष्टात आलं. व्यापार आणि औद्योगिक धोरणं उदार झाली. तसेच भांडवली बाजार आणि वित्तीयक्षेत्र मुक्त होऊ शकलं. या सुधारणांमुळे भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. भलेही देशाची लोकसंख्या ८८ कोटींहून १३८ कोटी झाली असली तरी गरीबी निर्मुलनाचा दर अर्धा राहिलाय, असंही अंबानी यांनी आपल्या लेखात म्हटलंय.

समृद्धीसाठी सांगितला पंचसूत्री कार्यक्रम

लेखातून मुकेश अंबानी यांनी पंचसूत्रीही सांगितली आहे. या सूत्रीमुळे भारत आपल्या आर्थिक समृद्धीचं स्वप्न पूर्ण करु शकतो. सर्व भारतीयांना समान आर्थिक ताकद देऊन विशेषतः गरीबांना मजबूत करुन आर्थिक समृद्धी मिळवता येईल. यासाठी पुन्हा एकदा नव्याने औद्योगिक क्रांती सुरु करण्याचं त्यांनी समर्थन केलं. त्याचबरोबर त्यांनी उद्योजकता वाढवण्यावरही भर दिला त्याशिवाय त्यांनी समृद्धी आणि आर्थिक पैलूंशिवाय आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणासारख्या दुसऱ्या गरजेच्या पैलूंकडेही लक्ष देण्याचं महत्व आधोरिखित केलं.

loading image
go to top