esakal | Breaking : पुलवामात दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; १२ नागरिक जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Indian_Army

सीआरपीएफ आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला असून या भागात जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. 

Breaking : पुलवामात दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; १२ नागरिक जखमी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पुलवामा : जम्मू काश्मीरमधील पुलवामाजवळ असलेल्या काकापोरामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात १२ काश्मीरी नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पथकाच्या दिशेने ग्रेनेड फेकली. पण त्यांचा नेम चुकल्याने रस्त्यावरच ग्रेनेडचा स्फोट झाला, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. 

नवा कृषी कायदा शेतकऱ्यासाठी ठरला फायदेशीर; तक्रार दाखल करताच मिळाली भरपाई​

या हल्ल्यात सीआरपीएफच्या दलाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झाले नाही. निशाणा चुकल्यामुळे ग्रेनेडचा रस्त्यावर स्फोट झाला. ग्रेनेडचे छर्रे उडल्याने तेथील १२ नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तेथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. 

सीआरपीएफ आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला असून या भागात जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. 

घर घेणाऱ्यांसाठी 'अच्छे दिन' आणखी एका बँकेने घेतला ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय​

दरम्यान, सोमवारी (ता.१६) कुलगाम जिल्ह्यातील पोलिस चौकीवर दहशतवाद्यांनी अशाच प्रकारचा ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यातही ग्रेनेड पोलिस ठाण्याच्या बाहेर पडल्यामुळे सुदैवाने कुणी जखमी झालं नाही. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये वारंवार चकमकी झडत आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात ५ भारतीय जवान शहीद झाले होते. याचा बदला घेत भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात पाक सैन्याचे बंकर उद्ध्वस्त केले होते. तसेच ११ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 

- इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image