
बंगळुरूमधील नर्सिंग कॉलेजचे 12 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील एका नर्सिंग कॉलेजच्या 12 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे, त्यापैकी 11 विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्ण झाले आहे, म्हणजेच या विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
याआधी गुरुवारी कर्नाटकमधील एका मेडीकल कॉलेडमधील 66 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. महत्वाची बाब म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेक. कर्नाटकातील धारवाडमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॉलेजमधील एका कार्यक्रमानंतर 400 पैकी 300 विद्यार्थ्यांची कोविडची चाचणी करण्यात आली त्यामध्ये एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसचे 66 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि उपायुक्तांच्या आदेशावरून खबरदारी म्हणून महाविद्यालयातील दोन वसतिगृहे सील करण्यात आली आहेत. सध्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यास मनाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बाधित विद्यार्थ्यांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे
धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील यांनी त्यांच्यावर वसतिगृहातच उपचार केले जातील, असे सांगितले होते. पाटील म्हणाले की, उर्वरित 100 विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी केली जाईल. आम्ही विद्यार्थ्यांना क्वारंटाईन केले आहे. आम्ही दोन वसतिगृहे सील केली आहेत. विद्यार्थ्यांना उपचार आणि जेवण दिले जाईल. कोणीही वसतिगृहातून बाहेर पडू शकणार नाही तसेच ज्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी बाकी आहे त्यांनाही त्याच कॅम्पसमध्ये क्वारंटाईन केले जाईल.