
International Flights: 15 डिसेंबरपासून सुरु होऊ शकतात फ्लाईट्स; मात्र, या देशांत राहणार बंदी
नवी दिल्ली : एका मोठ्या कालावाधीनंतर आता पुन्हा एकदा नियमित रुपाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे (International Flights) लवकरच सुरु होत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबरपासून नियमित रुपाने आंतराराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी (International Flight Resumption) दिली जाऊ शकते. मात्र, त्या देशांमध्ये प्रतिबंध तसाच राहिल ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचे संक्रमण अद्यापही गंभीर आहे. याआधी बुधवारी नागरी उड्डाण मंत्रायलयातर्फे (Ministry of Civil Aviation) आंतरराष्ट्रीय उड्डाणांसंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली होती.
सुत्रांनी सांगितलं की, जवळपास 14 असे देश आहेत, जे उड्डाण सुरु होण्याची वाट पाहत होते. त्या ठिकाणी कोरोना संक्रमण पुन्हा एकदा वाढल्यामुळे त्या सर्व देशांमध्ये प्रतिबंध अद्याप सुरुच राहिल. प्रतिबंधित देशांच्या यादीमध्ये युरोपिय संघातील काही देश तसेच इतर काही देश देखील सामील आहेत. या ठिकाणी कोरोनाच्या नव्या म्युटेशन आढळून आला आहे. सरकारकडून याआधीच सांगण्या आलंय की, यावर्षीच्या अंतापर्यंत कोरोनामुळे उड्डाणांवर असलेला प्रतिबंध हटवला जाईल.
पर्यटन उद्योजकांकडून सरकारवर दबाव
सध्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर असलेला हा प्रतिबंध मार्च 2020 पासून लागू आहे. आतापर्यंत कोरोनाची परिस्थिी पाहता हळूहळू या उड्डाणांवरील प्रतिबंध हटवण्याचा निर्णय सरकार घेत आहे. या दरम्यानच पर्यटन उद्योगाकडून देखील सरकारवर हे प्रतिबंध हटवण्याची मागणी केली जात आहे. ज्या देशात कोरोनाची परिस्थिती आवाक्यात आहे, त्याठिकाणचे प्रतिबंध हटवण्यात यावेत, अशी मागणी पर्यटन उद्योगांकडून करण्यात येत आहे. सरकारने याआधीच पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी 15 ऑक्टोबर पासून चार्टर्ड प्लेनमधून पर्यटकांना येण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर 15 नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करण्याची घोषणा देखील केली होती.