12-year-old boy suicide ESakal
देश
Crime: ऑनलाइन गेम खेळत होता, नंतर खोलीत जाऊन १२ वर्षीय मुलानं गळफास घेतला, कारण जाणून सर्वांनाच धक्का बसला
Madhya Pradesh News: बारा वर्षीय मुलगा घरात ऑनलाइन गेम खेळत होता. त्यानंतर अचानकपणे तो खोलीत गेला. थोड्यावेळाने त्याच्या पालकांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे पाहताच त्यांना मोठा धक्का बसला आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर येथील एमआयजी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका १२ वर्षांच्या लहान मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या निष्पाप मुलाचा वाढदिवस ३० जुलै रोजी होता. त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.