Coronavirus : भारतात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण; रुग्णांची संख्या...

वृत्तसंस्था
बुधवार, 4 मार्च 2020

इटालियन पर्यटकालाही लागण

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने आता भारतातही धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर भारतात आत्तापर्यंत 28 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (बुधवार) दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना व्हायरसने जगभरात अक्षरश: थैमान घातले आहे. यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 78 हजारांपेक्षा अधिक आहे. तर यातील मृतांची संख्या 2800 पेक्षा अधिक आहे. ज्या भारतीयांना कोरोनाची लागण झाली, यामध्ये 21 पैकी 14 नागरिक हे इटालियन आहेत. त्यांना आता इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस, छावला येथे ठेवण्यात आले आहे. या सर्वांची चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना भारतात येऊ दे रे देवा; अभिनेत्याची प्रार्थना 

तसेच काल दिल्ली, हैदराबाद आणि जयपूर येथे संशयित रुग्ण आढळले होते. त्यानंतर या सर्वांची संख्या आता 28 झाली आहे. नोएडा येथे कोरोना व्हायरसच्या संशयातून तीन लहान मुलांसह इतर सहा जणांचे नमुने घेण्यात आले. या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

Coronavirus:चीनमध्ये कोरोना चेकपोस्टवर तपास अधिकाऱ्यांवर हल्ला; तरुणाला थेट मृत्यूदंड

दरम्यान, उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या आग्र्याला कोरोनाने आपले लक्ष्य बनवले आहे. आग्र्यातील सहा जणांना कोरोनाही लागण झाल्याचं सॅम्पल टेस्टमधून पुढे आलं आहे. दिल्लीतील कोरोना व्हायरसने ग्रासलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे या सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

इटालियन पर्यटकालाही लागण

दुबईहून तेलंगणमध्ये आणि सिंगापूरहून दिल्लीत दाखल झालेल्या दोन भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे मेडिकल रिपोर्टमधून निष्पन्न झाले होते. तर दुसरीकडे राजस्थानमध्ये आलेल्या इटालियन पर्यटकालाही कोरोनाची लागण झाली होती. या तिघांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

Video : अभिनेत्री म्हणते; अभिनंदन, देशात कोरोनाचे आगमन झालंय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 out of 21 Italian nationals have found positive for coronavirus says Harsh Vardhan