6 वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या; 15 वर्षाच्या मुलाला अटक

Assam Crime News
Assam Crime Newsesakal
Summary

हैलाकांडी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.

आसाममधील (Assam) हैलाकांडी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. हैलाकांडी येथे एका 15 वर्षीय आरोपीनं त्याच्या शेजारी राहणाऱ्या 6 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. ही मुलगी 9 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. पोलीस (Police) तिचा शोध घेत होते. दरम्यान, तिचा मृतदेह 12 फेब्रुवारी रोजी जवळच्या जंगलात सापडला. ही घटना घडवणाऱ्या 15 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आलीय.

ही घटना हैलाकांडी जिल्ह्यातील सुल्तानीचेरा भागामधील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारीला बेपत्ता होण्यापूर्वी ही मुलगी परिसरातील इतर मुलांसोबत खेळत होती, असं प्राथमिक तपासात समोर आलंय. या मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता, तिचा मृतदेह 12 फेब्रुवारी रोजी जवळच्या जंगल परिसरात सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा मृत्यू होण्यापूर्वी आरोपीनं तिला गंभीर जखमी केलं होतं. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी हैलाकांडी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय.

शिर्डीत रेकी केल्याची कबुली; दुबईचे तिघे ATS च्या ताब्यात

मुलाचं समर्थन करुन पुरावे नष्ट केल्याबद्दल आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आलीय. या घटनेनंतर आसाम राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या Assam State Commission for Protection of Child Rights (ACCPCR) अध्यक्षा डॉ. सुनीता चक्रवर्ती यांच्या सूचनेनुसार, गुवाहाटीतील एक पथक हैलाकांडी इथं पोहोचलं असून या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान, एसीपीसीआर आणि पोलिसांनी मिळून या प्रकरणाचा 24 तासांत छडा लावलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com