आनंदावर विरजन! वाढदिवसादिवशीच १०वीच्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू! मग पुढे…

16 year old Class 10 student dies of cardiac arrest in hydrabad on his birthday
16 year old Class 10 student dies of cardiac arrest in hydrabad on his birthday

चालता-बोलता अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने जीव जाण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहे. यादरम्यान अशाच एका घटनेत, 19 मे रोजी मंचेरियल येथे एका अवघ्या 16 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.दुर्दैव म्हणजे त्याच्यावर ऐन वाढदिवसादिवशीच काळाने घाला घातला.

या घटनेने मुलाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र यानंतर देखील पालकांनी त्याच्या आठवणीत वाढदिवसाचा केक कापला आणि आपल्या मुलाला श्रद्धांजली म्हणून सचिनच्या पार्थिवाच्या बाजूला तो ठेवला.

हैद्राबदच्या असिफाबाद मंडळातील बाबापूर गावातील दहावीचा विद्यार्थी असलेला सचिन याचा 18 मे रोजी त्याच्या वाढदिवस होता. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो असिफाबाद शहरात खरेदीसाठी बाहेर पडला होता.

तेव्हा आचानक त्याला छातीत दुखू लागल्याने तो कोसळला. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना मंचेरियल शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.

16 year old Class 10 student dies of cardiac arrest in hydrabad on his birthday
Prakash Javadekar : लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला कर्नाटकात चांगले यश मिळेल - प्रकाश जावडेकर

सचिनचे पार्थिव गावातील त्याच्या घरी आणण्यात आले आणि शोकाकुल असतानाही कुटुंबीयांनी त्याच्या वाढदिवसाचा केक कापला. पालक - गुणवंत राव आणि ललिता - शेजारी, मुले आणि नातेवाईकांना बोलावण्यात आलं आणि सचिनचा हात धरून त्यांनी 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर केक कापला. यावेळी मुलांनी सचिनच्या वाढदिवसाचे गाणे गायले, तर स्थानिक ग्रामस्थांनी त्याच्या स्मरणार्थ मेणबत्ती पेटवली.

16 year old Class 10 student dies of cardiac arrest in hydrabad on his birthday
Daya NayaK : 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' दया नायक दोन दशकांनंतर पुन्हा परत; 'इथे' झाली नेमणूक

मित्रांनी सचिनच्या फोटोंसह वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक मोठा फ्लेक्स देखील लावला. सचिन आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक होता. त्याचा वाढदिवस हा त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसाठी मात्र शोकाचा दिवस ठरला. बाबापूर येथे संपूर्ण गाव त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जमा झाले होते. सचिन हा या दाम्पत्याचा तिसरा मुलगा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com