NCRB Report : 20 वर्षात पोलीस कोठडीत 1888 जणांचा मृत्यू; 'या' प्रकरणांत फक्त 26 पोलिसच 'दोषी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Custody

भारतातील पोलीस कोठडीत मृत्यूची प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत.

NCRB Report : 20 वर्षात पोलीस कोठडीत 1888 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

भारतातील पोलीस कोठडीत (Police Custody) मृत्यूची प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. यासंदर्भातील अधिकृत आकडेवारीत जे काही समोर आलंय, ते धक्कादायक आहे. खरं तर, गेल्या 20 वर्षांत देशभरातील कोठडीत असताना 1888 लोकांचा मृत्यू झालाय. मात्र, या मृत्यूंवरील कारवाईची आकडेवारी पाहिली, तर 20 वर्षांत केवळ 26 पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी दोषी आढळल्याचं समोर आलंय.

विशेष म्हणजे, यूपीच्या पोलीस कोठडीत देखील मृत्यूची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कासगंजमध्ये अल्ताफ नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्याचवेळी, मंगळवारी कानपूरमध्ये चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला रुग्णालयातून बाहेर पडताना जीव गमवावा लागला. पोलिसांनी त्याला कोठडीत इतकं मारलं, की त्याचा मृत्यू झाला, असा नातेवाईकांचा आरोप आहे.

हेही वाचा: चारा घोटाळा : CBI च्या आदेशामुळं लालूंच्या अडचणीत वाढ

कोठडीतील मृत्यूसाठी केवळ 26 पोलिसच जबाबदार

अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 20 वर्षांत कोठडीत मारल्या गेलेल्या लोकांपैकी 893 प्रकरणांमध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी 358 पोलिसांवर आरोपपत्रही सादर करण्यात आलंय. मात्र, कोठडीतील मृत्यूसाठी केवळ 26 पोलिसांनाच जबाबदार धरता आलं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 20 वर्षात कोठडीत मृत्यू झालेल्या 1888 लोकांपैकी 1185 जणांना रिमांडमध्ये ठेवलं नाही, असं दाखवण्यात आलंय. कोठडीत केवळ 703 मृत्यू हे रिमांडदरम्यान झालेल्या जीवितहानीच्या श्रेणीत दाखवण्यात आले आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की, गेल्या 20 वर्षात कोठडीत मृत्यू झालेल्यांपैकी 60 टक्के लोकांना मृत्यूपूर्वी एकदाही कोर्टात हजर करण्यात आलं नव्हतं.

हेही वाचा: दगा फटका टाळण्यासाठी 28 जणांना सोबत घेऊन रांजणे 'नॉट रिचेबल'

NCRB नं केला मोठा खुलासा

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी म्हणजे, 2020 मध्ये देशभरातील कोठडीत 76 जणांचा मृत्यू झाला. अशा राज्यांमध्ये गुजरातचं नाव आघाडीवर आहे, जिथं कोठडीत 15 जणांना जीव गमवावा लागला. मृतांपैकी एकही दोषी सिद्ध झाला नाही. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत कोठडीतील मृत्यूप्रकरणी 96 पोलिसांना अटक करण्यात आलीय. मात्र, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला नाही.

हेही वाचा: निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाला धक्का; चार आमदार भाजपात दाखल

loading image
go to top