1993 Bomb Blast Case: 1993च्या साखळी स्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची सुटका; टाडा कोर्टाचा निकाल

अजमेरच्या टाडा कोर्टानं टुंडाची सुटका केली आहे तर इतर दोन आरोपींना शिक्षा ठोठावली आहे.
1993 Bomb Blast Case
1993 Bomb Blast Case

अजमेर : अयोध्येत बाबरी पाडल्यानंतर १९९३ मध्ये देशभरात मुंबईसह सहा ठिकाणी ट्रेन्समध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते. यातील एक आरोपी अब्दुल करीम टुंडा याची अजमेरच्या टाडा कोर्टानं सुटका केली आहे. तर इतर दोन आरोपी इरफान आणि हमीदुद्दीनं यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (1993 bomb Blast case release accused abdul karim tunda ajmer tada court gives descion)

1993 Bomb Blast Case
Himachal Pradesh Political Crisis : काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी केलं अपात्र!

१९९३ मध्ये कोटा, लखनऊ, कानपूर, हैदराबाद, सूरत आणि मुंबई या शहरांमधील ट्रेन्समध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते. या प्रकरणावरील सुनावणीवर सरकारी वकीलांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, टुंडा याची कुठल्या कारणांमुळं सुटका झाली, यावर निकालाचं वाचन केल्यानंतर टिप्पणी करता येईल. (Latest Marathi News)

1993 Bomb Blast Case
Wakeel Hassan: बोगदा दुर्घटनेत रॅट मायनर म्हणून मजुरांचे वाचवले प्राण अन् आज प्रशासनानं केलं बेघर

२०१३ मध्ये झाली होती अटक

सीबीआयनं टुंडाला या स्फोटांचा मास्टरमाईंड ठरवलं होतं. तसेच २०१३ मध्ये नेपाळच्या बॉर्डवरुन त्याला अटक झाली होती. टुंडा याच्यावर देशातील विविध ठिकाणी दहशतवादी कारवायांप्रकरणी खटले सुरु आहेत. टुंडा यानं कथितरित्या तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं. एक पाकिस्तानी नागरीक जुनैदसोबत त्यानं १९९८ मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला केल्याची योजना आखली होती. (Marathi Tajya Batmya)

1993 Bomb Blast Case
Farmer's Protest: आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट, व्हिसा होणार रद्द! हरयाणा पोलिसांचा इशारा

कोण आहे टुंडा?

मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये सहभागी होण्यापूर्वी टुंडानं जालीस अन्सारीसोबत मुंबईत मुस्लीम समुदयासाठी काम करण्याच्या उद्देशानं 'तंजीम इस्लाह उल मुस्लीमीन' नावाची संस्था स्थापन केली होती. मध्य दिल्लीच्या दरियागंजमध्ये छत्ता लाल मिया भागात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या टुंडाने आपल्या वडिलांचं गाव गाझियाबादमध्ये सुतारकाम सुरु केलं होतं.

त्यानंतर त्यानं भंगार व्यवसायही केला. ८०च्या दशकात पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयच्या एजंट्सच्या माध्यमातून तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. त्यानंतर तो एक कट्टरपंथी बनला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com