आसामला पावसाचा मोठा तडाखा; २० जणांचा मृत्यू

20 Dead In Landslides In South Assam, Several Injured
20 Dead In Landslides In South Assam, Several Injured

गुवाहाटी - आसामला पावसाने मोठा तडाखा दिला असून आसामच्या विविध भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, यामध्ये सुमारे २० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात मान्सूनचे आगमन होत असतानाच पूर्वोत्तर भारताला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मृत्यू झालेल्यांमध्ये दक्षिण आसामधील तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या व्यक्तींचा समावेश आहे. भूस्खलना्च्या या घटना दक्षिण आसाममधील बराक घाटी परिसरात घडल्या आहेत. या भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे डोंगराळ भागात हे भूस्खलन घडले आहे. या भूस्खलनामध्ये कछार जिल्ह्यातील सात, हेलाकांडी जिल्ह्यातील सात आणि करीमगंज जिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आपत्ती निवारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, बचाव पथकाला घटनास्थळावर पोहोचले असून पुढील मदतकार्य चालू आहे. या पावसामुळे आणि भूस्खलनाच्या घटना घडल्यामुळे एकूण २७००० हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज तेथिल अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

दरम्यान एकूणच उत्तर भारताला ३० मे रोजी जोरदार पावसाने झोडपले आहे. या दरम्यान उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या घटनांमध्येही ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रेदश सरकारकने याबाबतची माहिती दिली होती. उत्तरप्रदेश सरकारकडून या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. उन्नाव जिल्ह्यात ०८ आणि कन्नोजमध्ये ०५ लोकांचा जीव गेला आहे. तसेच लखनऊ शहरात घर कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच वेगवेगळ्या भागात ६ लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहेत.

भारत नक्कीच आत्मनिर्भर बनेल; हा आहे नवा फॉर्म्युला : पंतप्रधान मोदी    

शनिवारी रात्री बहुआ भागात धूळीचे वादळ आले होते. वादळामुळे एक कच्चे घरे पडले आहे. यात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कुसुम्भी गावातही घर पडल्याने एका ६० वर्षीय व्यक्तीचा जीव गेला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com