तेलंगणात 20 वर्षीय तरुणीवर 3 दिवस बलात्कार, 2 जणांवर गुन्हा दाखल

Rape Crime news
Rape Crime newsSakal

20 वर्षीय मुलीवर तीन दिवस बलात्कार केल्याच्या आरोपाखाली कोडाड पोलिसांनी सोमवारी TRS नेत्याच्या मुलासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना, दुसरा आरोपी, जो कोडाड, सूर्यापेट येथील टीआरएस नेत्याचा मुलगा आहे, तो अजूनही फरार आहे,असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींवर आयपीसीच्या कलम ३७६ डी (गँगरेप) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तिच्या तक्रारीत, पीडितेने सांगितले की, ती शुक्रवारी एका आरोपीला भेटली, जो तिचा मित्र आहे आणि त्याने तिला वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी घरी बोलावले. त्‍याच्‍या घरी त्‍याने मद्यप्राशन केले, तर तिला शीतपेय पाजण्‍यात आले. पीडितेने दावा केला आहे की तिच्या पेयात गुंगीचे औषध होते.

Rape Crime news
PM मोदी लाल किल्ल्यावरून करणार देशाला संबोधित; मोडणार जुनी परंपरा

नंतर, दोघांना एका तिसर्‍या व्यक्तीला सामील केले, दुसरा आरोपी त्याने देखील मद्यपान केले होते. शुक्रवार रात्री ते रविवारपर्यंत, पीडितेवर अनेक वेळा बलात्कार झाला, असा दावा तक्रारकर्त्याने केला आहे, सूर्यापेटचे पोलिस अधीक्षक राजेंद्र प्रसाद यांनी TOI ला सांगितले.

रविवारी रात्री पीडित मुलगी घरी परतल्यावर तिच्या आईने तिचा ठावठिकाणा विचारला. तिने तिला तीन दिवस कसे कैद केले होते याबद्दल तिने तिच्या आईला सांगितले. तिने असेही सांगितले की दुसरा आरोपी घरात राहत नव्हता परंतु त्या काळात त्याने अनेक वेळा घराला भेट दिली,असे पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले. पीडितेला नंतर वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून तिची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

Rape Crime news
''..तर मी नाही म्हणणार नाही"; संघटनांवर बंदीबाबत शरद पवारांचे विधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com