'गृहलक्ष्मी'च्या लाभार्थ्यांना रकमेची प्रतीक्षाच! महिलांच्या खात्यावर जमा होत नाहीयेत 2000 रुपये

कुटुंबप्रमुख महिलांसाठी आधारभूत ठरलेल्या गृहलक्ष्मी योजनेला (Gruhalakshmi Yojana) सुरुवातीपासूनच अनेक विघ्न येत आहेत.
Gruhalakshmi Yojana Lakshmi Hebbalkar
Gruhalakshmi Yojana Lakshmi Hebbalkaresakal
Summary

मागील महिन्यात मंत्री हेब्बाळकर यांनी दर महिन्याच्या १५ ते २० तारखेच्या कालावधीत सर्व पात्र कुटुंबप्रमुख महिलांच्या खात्यात दोन हजार रुपयाची रक्कम जमा होईल, असे सांगितले होते.

बेळगाव : राज्य सरकारची (Karnataka Government) महत्त्वाकांक्षी योजना आणि राज्यातील कुटुंबप्रमुख महिलांसाठी आधारभूत ठरलेल्या गृहलक्ष्मी योजनेला (Gruhalakshmi Yojana) सुरुवातीपासूनच अनेक विघ्न येत आहेत. यंदाचे वर्ष सरत आले तरी योजनेची अंमलबजावणी सुरळीतपणे झालेली नाही. त्यामुळे अर्ज केलेल्या असंख्य कुटुंबप्रमुख महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही.

तर, नोव्हेंबर महिन्यातील योजनेतील रक्कम अद्यापही पात्र कुटुंबप्रमुख महिलांच्या खात्यात जमा झालेली नाही. डिसेंबरमधील अखेरचा आठवडा सुरू झाला तरीही रक्कम जमा झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याआधी योजनेतील रक्कम जमा होण्यास तांत्रिक समस्या उद्भवली असल्याचे कारण देण्यात येत होते.

Gruhalakshmi Yojana Lakshmi Hebbalkar
Congress Government : कर्जमाफीसाठीच शेतकऱ्यांना राज्यात दुष्काळ हवा असतो; मंत्री पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनी यासंदर्भात विधानसौधमधील आपल्या कार्यालयात गृहलक्ष्मी योजनेची विकास आढावा बैठक घेतली होती. तांत्रिक समस्या सोडवून लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करावी, अशी सूचना मंत्री हेब्बाळकर यांनी आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना केली होती. परंतु, नोव्हेंबरमधील रक्कम अद्यापही जमा झालेली नाही.

Gruhalakshmi Yojana Lakshmi Hebbalkar
Central Railway : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तीन एक्स्प्रेस रेल्वे दहा दिवस राहणार बंद, काय आहे कारण?

मागील महिन्यात मंत्री हेब्बाळकर यांनी दर महिन्याच्या १५ ते २० तारखेच्या कालावधीत सर्व पात्र कुटुंबप्रमुख महिलांच्या खात्यात दोन हजार रुपयाची रक्कम जमा होईल, असे सांगितले होते. मात्र, केवळ नोव्हेंबरमध्ये (ऑक्टोबरमधील) रक्कम वेळेवर जमा झाली आहे.

Gruhalakshmi Yojana Lakshmi Hebbalkar
'उदं ग आई उदं'चा सौंदत्तीत जयघोष; महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोव्यातील 4 लाख भाविकांची डोंगरावर हजेरी

तांत्रिक त्रुटी असल्यास दूर कराव्यात तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पात्र लाभार्थ्यांच्या घरी जाऊन नोंदणीमध्ये किंवा अन्य समस्या झाल्या असल्यास त्या सोडविण्यात याव्यात, अशी सूचनाही मंत्री हेब्बाळकर यांनी केली होती. परंतु, अद्याप अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून अशी कामे सुरू झालेली दिसून आलेली नाहीत. त्यामुळे नोव्हेंबरमधील गृहलक्ष्मीची रक्कम कधी जमा होणार याकडे पात्र महिलांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com