भयानक! हुंडा न दिल्याने २१ वर्षीय नववधूला प्यायला लावलं ॲसिड

तीन महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. या घटनेत तिचा मृत्यू झाला आहे.
Dowry system
Dowry system sakal

बिहारमध्ये एका नवविवाहितेला तिच्या सासरच्यांनी ॲसिड प्यायला लावल्याची भयानक घटना घडली आहे. या घटनेनंतर या मुलीचा मृत्यू झाला आहे. दोन लाख हुंडा न दिल्याने या नववधूला सासरच्यांनी ठार मारलं आहे.

या नवविवाहितेच्या माहेरच्यांनी याबद्दल सासरच्यांवर आरोप केले आहे. तीन महिन्यांपूर्वीच या मुलीचं लग्न झालं होतं. तेव्हापासून तिचा पती आणि सासरच्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली होती. दोन लाख रुपये हुंडा आणि एका टू व्हीलरसाठी या २१ वर्षीय मुलीचा छळ होत असल्याचं तिच्या सासरच्यांनी सांगितलं.

Dowry system
हुंडा न दिल्याने सासरच्यांकडूनच सामूहिक बलात्कार, नवऱ्यानेच शूट केला व्हिडीओ

बिहारमधल्या बेगुसरायमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात या मुलीचा नवरा बाल्मिकी साहनी याला अटक करण्यात आली आहे. या मुलीच्या भावाने सांगितलं की, यापूर्वी तिच्या सासरच्यांनी तिच्यावर ॲसिड फेकलं, त्यानंतर त्यांनी तिला ॲसिड प्यायला लावलं.

Dowry system
हुंडा अन्‌ पैशासाठी विवाहितांचा छळ! चार भिंतीतील भांडण पोलिस ठाण्यात

या घटनेपूर्वी या मुलीची आपल्या पतीसोबत भांडणं झाली होती. पतीला अटक केल्यानंतर त्याच्याही अंगावर ॲसिडच्या काही खुणा आढळून आल्या. त्याने सांगितलं की, रागात माझ्या डोक्यावर ॲसिडची बाटली फुटली, त्यानंतर मी धावतपळत बाहेर हातपंपाजवळ गेलो, पण मी बेशुद्ध झालो होतो. परत आलो तेव्हा मला कळलं की तिला रुग्णालयात नेलं आहे. या प्रकरणातला पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com