जेंव्हा पाकिस्ताननं काश्मीरमध्ये पहिल्यांदा घुसखोरी केली; पाकच्या कुटील कारवायांचा काळा दिवस

kashmir 22 oct
kashmir 22 oct

नवी दिल्ली : काश्मीरच्या शांतीचा आणि सौंदर्याचा पाकिस्तान हा नेहमीच शत्रू राहिला आहे. आताच नव्हे तर 73 वर्षांपासूनच पाकिस्तान काश्मीर भागात अशा कुरापती करुन या भागाचे सौंदर्य खुडत आला आहे. 22 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने कबायली हल्लेखोरांच्या मदतीने  पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला होता. पाकिस्तानी आक्रमकांनी अवैध पद्धतीने जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करुन मोठ्या प्रमाणावर लूटमार आणि महिलांवर अत्याचार केले होते. या हल्ल्यात  मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली  होती आणि खुप रक्त सांडलं गेलं होतं. काल भारताने हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला. 

22 ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले आणि मोठ्या प्रमाणात लूटमार आणि तोडफोड केली होती. याबाबतचे  भयानक किस्से आजही इतिहासाच्या पानात दबून गेले आहे.  या दिवशीच काश्मिरमधील बारामुल्ला शहराला वेढा घातला गेला. आणि या काळ्या दिवशी  हजारो पुरुष, महिला व मुले ठार झाली.

पाकिस्तानी सैन्याला थोड्या थोड्या संख्येने हल्ल्यासाठी पाठवण्यात आलं. या सैनिकांना हल्लेखोरांसोबत पाठवलं गेलं होतं. 26 ऑक्टोबर रोजी या आक्रमकांनी बारामूलामध्ये प्रवेश केला आणि हृदयद्रावक असा अत्याचार केला. 26 ऑक्टोबर रोजी सैन्याने बारामूलावर आपला ताबा प्रस्थापित केला आणि तेथे अनन्वित अत्याचार केला. हजारो लोकांची हत्या केली.

या हल्ल्यानंतर काश्मीरचे महाराजा हरिसिंहने भारत सरकारला मदतीची याचना केली. आणि त्यानंतर मग भारतात काश्मीर विलीन झाला. यानंतर 27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय सेनेने काश्मिरधून या हल्लेखोरांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय फौजांनी आपले ऑपरेशन सुरु करताच पाकिस्तान घाबरला. भारताच्या सेनेने पाकिस्तानी फौजांवर आक्रमण केलं आणि मग हे हल्लेखोर मागे हटायला लागले. परंतु तोपर्यंत पाकिस्तानच्या हल्लेखोरांनी मोठ्या प्रमाणावर हिंसा केली होती. 

भारतीय सैन्य आपल्या पराक्रमांनी पाकिस्तानला मागे हटवत होतं मात्र यादरम्यानच युद्धबंदी लागू झाली. पीओकेचा भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयाला तत्कालिन पंतप्रधान नेहरु यांना मान्य करावं लागलं होतं ज्यामुळे हा भाग आता पाकिस्तानच्या ताब्यात राहीला आहे. या साऱ्या अमानुषतेला जबाबदार फक्त पाकिस्तान होता. पाकने आपल्या सेनेला कबायली हल्लेखोरांच्या मदतीने काश्मिरला उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवलं होतं. पाकिस्तानने सुरु केलेल्या या रक्तरंजित कारवायांन कधीच विसरलं जाऊ शकत नाही. 
काल नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूटतर्फे काश्मीरमध्ये '22 ऑक्टोबर  1947 च्या आठवणी’ या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com