26/11 Mumbai Terror Attacks: भारताला मोठे यश, तहव्वूर राणाचे होणार प्रत्यार्पण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 160 हून अधिक जण ठार झाले होते. 

नवी दिल्ली- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रकरणी अमेरिकन सरकारने न्यायालयाला ही माहिती दिली आहे. पाकिस्तानी वंशाच्या कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्याच्या विनंतीनंतर 10 जून रोजी लॉस एंजिलिस येथून पुन्हा एकदा अटक करण्यात आली होती. त्यावेळी राणाने आपण कोरोनाबाधित असल्याचे म्हटले होते. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 160 हून अधिक जण ठार झाले होते. 

तहव्वूरचा जन्म पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात झाला होता. त्याने पाकिस्तानमधील कॉलेज हसन अब्दालमधून वैद्यकीय पदवी प्राप्त केली होती. याच कॉलेजमध्ये त्याची भेट मुंबई हल्ल्यातील आणखी एक आरोपी आणि पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमन हेडली उर्फ सय्यद दाऊद गिलानीबरोबर झाली होती. राणा 1997 मध्ये कॅनडामध्ये गेला होता. 2001 मध्ये त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले होते. 

हेही वाचा- शेहला रशीद राष्ट्रदोही, तिच्याकडून जीवाला धोका; वडिलांनीच पोलिसांकडे केली तक्रार

2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हात

भारत आणि अमेरिकेमध्ये 1997 मध्ये प्रत्यार्पण करार झाला होता.  दरम्यान, राणाला 11 जून रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकन डिस्ट्रिक्ट कोर्टाचे न्यायाधीश जॅकलिन चूलजियान यांनी याप्रकरणी 30 जून तारीख निश्चित केली होती. राणाच्या वकिलांना 22 जूनपर्यंत याचिका दाखल करण्यास आणि संघीय सरकारला 26 जूनपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते. सहाय्यक अटॉर्नींनी म्हटले होते की, राणाविरोधात ज्या गुन्ह्यासाठी अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे ते प्रत्यार्पण कराराच्या अनुच्छेद-2 अंतर्गत येते. 

हेही वाचा- आठवण 32 वर्षांपूर्वीच्या शेतकरी आंदोलनाची; राजीव गांधी सरकारला झुकवणारा रांगडा नेता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 11 mumbai terror attack convict tahawwur rana will be extradited 2008