esakal | भारत-अमेरिकेत संरक्षण करार; शस्त्रास्त्र खरेदीवर शिक्कामोर्तब!
sakal

बोलून बातमी शोधा

Trump-Modi

डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमामध्येच तीन अब्ज डॉलर किमतीचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि इतर संरक्षण उपकरणांबाबतचा उल्लेख केला होता.

भारत-अमेरिकेत संरक्षण करार; शस्त्रास्त्र खरेदीवर शिक्कामोर्तब!

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेने संरक्षण, ऊर्जासुरक्षा तसेच आरोग्यासह तंत्रज्ञान आदान-प्रदानाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या क्षेत्रातील सहकार्यावर मंगळवारी (ता.२५) सहमती व्यक्त केली. औपचारिक कराराची प्रक्रिया नंतर मार्गी लागणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान सहकार्यावर सविस्तर चर्चा झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत असलेल्या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी हैदराबाद हाउसमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये आरोग्य क्षेत्रातील दोन, तर ऊर्जासुरक्षेशी निगडित एक अशा एकूण तीन सामंजस्य करारांवर शिक्कामोर्तब केले.

- मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांना आरक्षणाचा लाभ नाही

मानसिक आरोग्य, वैद्यकीय उपकरणांची सुरक्षा; त्याचप्रमाणे इंधनसुरक्षेसाठी परस्परसहकार्याच्या सामंजस्य करारावरही पुढे जाण्याचे दोन्ही देशांनी ठरविले. तीन अब्ज डॉलरहून अधिक रकमेच्या संरक्षण साहित्यविषयक करारांमुळे दोन्ही देशांमधील सामरिक संबंध अधिक दृढ झाल्याचे ट्रम्प यांनी या वेळी आवर्जून नमूद केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमामध्येच तीन अब्ज डॉलर किमतीचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि इतर संरक्षण उपकरणांबाबतचा उल्लेख केला होता. 

- '...त्यासाठी मी अमेरिकेचा अध्यक्ष राहिलो पाहिजे'; अंबानींच्या प्रश्नाला ट्रम्प यांचे उत्तर!

संरक्षण साहित्य खरेदी कराराअंतर्गत भारत अमेरिकेकडून 24 एमएच-60 रोमिओ हेलिकॉप्टर आणि अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. पाणबुड्यांना आणि युद्धनौकांना हवेतून लक्ष्य करण्याची रोमिओ हेलिकॉप्टरची क्षमता सर्वमान्य असल्याने या बहुद्देशीय हेलिकॉप्टरची नौदलाकडून सातत्याने मागणी होत होती.

रोमिओ हेलिकॉप्टर भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर भारताच्या मारक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे बचावकार्यातही या हेलिकॉप्टरचा प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो. 

- #ShahrukhMuslimTerrorist : ...अन् शाहरुखने रोखली पोलिस कॉन्स्टेबलवर बंदूक; व्हिडिओ व्हायरल!

या करारांवर सहमती 

- तीन अब्ज डॉलरचे संरक्षण करार 
- अमेरिका २४ एमएच-६० रोमिओ व अपाचे हेलिकॉप्टर देणार 
- मानसिक आरोग्य, वैद्यकीय उपकरणांची सुरक्षा, इंधनसुरक्षेसाठी सहकार्य

loading image