'...त्यासाठी मी अमेरिकेचा अध्यक्ष राहिलो पाहिजे'; अंबानींच्या प्रश्नाला ट्रम्प यांचे उत्तर!

Trump-Ambani
Trump-Ambani
Updated on

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज ट्रम्प यांनी भारतातील काही प्रमुख कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) संवाद साधला. आणि व्यापारविषयक चर्चा केली. 

या कार्यक्रमाला रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानीही उपस्थित होते. यावेळी अंबानी आणि ट्रम्प यांच्यामध्ये प्रश्नोत्तरांची जुगलबंदी रंगली. तुम्ही अमेरिकेत किती गुंतवणूक केली यावर मी लक्ष्य ठेऊन असतो, असे ट्रम्प यांनी म्हटल्यावर अंबानींनी त्यांना उत्तर दिले. मी अमेरिकेत आतापर्यंत ७ अरब डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, असे अंबानींनी सांगितल्यावर खूप छान अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली. 

तुम्ही ५जी आणणार आहात? असा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केला. तेव्हा अंबानी यांनी त्यांच्या टेलिकॉम व्यवसायाबद्दल माहिती दिली. आम्ही ५-जी क्षेत्रामध्ये उतरणार आहोत. तसेच एकही चिनी कंपोनंट न वापरणारी एकमेव कंपनी अशी रिलायन्सची ओळख असल्याचे अंबानी यांनी सांगितले. 

भारतीयांना व्यवसाय करणे सोपे झाले - अंबानी

अंबानी यांनीही ट्रम्प यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, आपल्या कारकीर्दीत भारतीय कंपन्यांना तिथे व्यवसाय करणे सोपे झाले आहे. सर्व प्रक्रिया जलद आणि सुलभ झाल्या आहेत. ही प्रक्रिया अशीच यापुढेही सुरू राहील, अशी मी अपेक्षा करतो. यासाठी मी यापुढेही अमेरिकेचा अध्यक्ष राहिलो पाहिजे, असे मजेशीर प्रत्युत्तर ट्रम्प यांनी दिले. तसेच मी नक्कीच विजयी होईन, असा मनोदयही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

अंबानींनी मानले मोदींचे आभार

अमेरिकेतील कॉर्पोरेट टॅक्सचे दर कमी केल्याबद्दल मुकेश अंबानींनी ट्रम्प यांचे आभार मानले. अंबानी म्हणाले की, आपण अमेरिकेत टॅक्सचे दर कमी केल्यामुळे भारतातील उद्योगपतींना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 2019 मध्ये मोदी सरकारनेही उद्योगपतींना दिलासा देत कॉर्पोरेट टॅक्सच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचे देशभरातील उद्योगपतींनी कौतुक केले. आणि आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com