#ShahrukhMuslimTerrorist : ...अन् शाहरुखने रोखली पोलिस कॉन्स्टेबलवर बंदूक; व्हिडिओ व्हायरल!

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

शाहरूख जाफराबादमधील स्थानिक रहिवासी असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. तसेच काही लोक घरातून गोळीबार करत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले असतानाच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हिंसक वळण लागले. सीएए आणि एनआरसी या कायद्यांविरोधात शाहीन बाग येथे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते. त्याला सोमवारी हिंसक वळण मिळाले. या हिंसाचाराचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून यातील एका फोटोने नेटकऱ्यांची झोप उडाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दंगलीत सहभागी झालेल्या एका तरुणाने पोलीस कॉन्स्टेबलवर बंदूक रोखलेले या फोटोत पाहायला मिळत असून त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली. दिल्लीच्या मौजपूर भागातील नहर रोडवरील शेठ भगवानदास स्कूलसमोरील रस्त्यावरील दुकानांना आगी लावल्यानंतर दंगेखोरांनी आपला मोर्चा जाफराबादकडे वळविला. त्यावेळी काही ठिकाणी त्यांनी दगडफेकही केली.

- #BoycottTakht : 'हिंदू टेररिस्ट' ट्विटमुळे उफाळला नवा वाद; लेखकाला...

यावेळी एका पोलिस कॉन्स्टेबलने दंगलीतील तरुणाला हिंसा करण्यापासून रोखण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्या तरुणाने पोलिसावरच बंदूक रोखली. तरीही तो पोलिस घाबरला नाही. मात्र, मागील जमावाने दगडफेक करण्यास सुरवात केल्यावर त्याला मागे हटावे लागले.  

दरम्यान, पोलिसावर बंदूक रोखणाऱ्या तरूणाचे नाव मोहमंद शाहरूख असल्याची माहिती पुढे येत असून त्याने चार ते पाचवेळा गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. एका भिंतीआडून तो गोळीबार करत असल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. त्याने पोलिसावर बंदूक रोखण्याआधी गोळ्यांच्या ७-८ फैरी झाडल्या होत्या. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

शाहरूख जाफराबादमधील स्थानिक रहिवासी असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. तसेच काही लोक घरातून गोळीबार करत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. 

- दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी ओवैसींनी सुचवला पर्याय

या हिंसाचारात आतापर्यंत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १३० जण जखमी झाले आहेत. सोमवारी खजूरी खास भागात हिंसाचार उसळल्यानंतर तेथे संचारबंदी लागू करण्यात आली होती. अशी माहिती जीटीबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुनील कुमार यांनी दिली.

- रायबाच्या शिक्षणासाठी लाखमोलाची मदत; तानाजी मालुसरेंच्या कुटुंबियांची भावना

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात पोलिस हेडकॉन्स्टेबल रतनलाल हे शहीद झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या हौतात्माचा आम्हाला अभिमान असून आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिली. यावेळी नायब राज्यपाल अनिल बैजाल उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi rioters Mohammed Shahrukh planted a gun on police constables chest