esakal | पुलवामा येथे पुन्हा चकमक; आता...
sakal

बोलून बातमी शोधा

पुलवामा येथे पुन्हा चकमक; आता...

मेंधार सेक्टरमध्ये चकमक

- लष्कर, सीआरपीएफची संयुक्त मोहीम

पुलवामा येथे पुन्हा चकमक; आता...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यांच्या या गोळीबाराला जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. 

मेंधार सेक्टरमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेजवळील मेंधार सेक्टरमध्ये ही चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलातील जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये जंगीर रफीक वणी, राजा उमर मक्बूल भट आणि उझायर अमिन भट या दहशतवाद्यांचा समावेश आहे.

कोरोनाचे पाप चीनचेच, चीनी संशोधकांचा दावा

लष्कर, सीआरपीएफची संयुक्त मोहीम

लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांनी ही संयुक्त मोहीम पुलवामा जिल्ह्यात राबवली.

अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानकडून यापूर्वीही अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा शस्त्रंसधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. 

डायमंड प्रिन्सेस जहाजावर जपान सरकारने वाटले 2 हजार आयफोन