कुपवाडा : चकमकीत ५ जवान हुतात्मा तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा!

वृत्तसंस्था
Monday, 6 April 2020

तीन कुटुंबीयांपैकी दोन कुटुंब हे शोपियां जिल्ह्यातील आणि कुलगम जिल्ह्यातील एक कुटुंबीय असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात रविवारी (ता.५) रात्री दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत ५ जवान हुतात्मा झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. कुपवाडामधील केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ ही चकमक झाली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलाला केरन सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने शोध मोहीम राबवली होती. त्यावेळी घुसखोर आणि जवानांमध्ये चकमक झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली.

- Fight with Corona : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात; केंद्र सरकारचा निर्णय

श्रीनगर येथील सुरक्षा प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल आणि ४ एप्रिल दरम्यान झालेल्या या चमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तर, या चकमकीत सुरुवातीला एक जवान शहीद झाला, तर ६ जवान गंभीर जखमी झाले होते. जखमी जवानांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चार जवानांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून दोन जवान गंभीर असल्याचे सुरक्षा दलातर्फे सोमवारी (ता.६) सांगण्यात आले. लष्कराकडून केरन सेक्टरमध्ये शोधमोहिम सुरू आहे.

- Coronavirus : २४ तासांत कोरोनाच्या ६९३ नव्या केसेस; तबलिगींच्या संपर्कात...

दरम्यान, कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत ठार झालेल्या पाच दहशतवाद्यांपैकी तीन जण हे आमचे कुटुंबीय असल्याचा दावा दक्षिण काश्मीरमधील किमान तीन कुटुंबांनी पोलिसांकडे केला असून दहशतवाद्यांचे शव देण्याची मागणी सुरक्षादलाकडे केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- महाराष्ट्रात लॉकडाऊन उठवायचा की नाही? राजेश टोपेंचे स्पष्ट संकेत, म्हणालेत...

या तीन कुटुंबीयांपैकी दोन कुटुंब हे शोपियां जिल्ह्यातील आणि कुलगम जिल्ह्यातील एक कुटुंबीय असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. मात्र, अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नसल्याने याबाबत बोलणे चुकीचे असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 soldiers dead and 5 terrorists killed in Jammu Kashmir Kupwara area