esakal | दिलासा...नव्या कोरोना बाधितांच्या बरोबरीने बरे होणाच्या प्रमाण

बोलून बातमी शोधा

covid

दिलासा...नव्या कोरोना बाधितांच्या बरोबरीने बरे होणाच्या प्रमाण

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यात नव्या बाधितांची रोजची संख्या थोड्या कमी येत आहे. विशेष म्हणजे बरे होणाऱ्यांची संख्याही तेवढीच किंवा त्यापेक्षाही अधिक आहे. मात्र, शनिवारी (ता. २४) आणखी २१ जणांचा बळी गेला असून, त्यात भडगाव, बोदवड तालुक्यातील प’त्यकी चार असे आठ जणांचा समावेश आहे.

हेही वाचा: पत्नी’ कोरोनामुक्त आणि त्याने केली तिची ‘आरती’ !

जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यापासून रुग्णसंख्या वाढू लागली असून रोज हजार ते बाराशेवर रुग्ण संख्य समोर येत आहेत. मात्र गेल्या आठवड्यापासून रोज समोर येणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या आसपास स्थिर झाली आहे. शनिवारी तब्बल दहा हजार 515 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यांपैकी एक हजार ४६ रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्णसंख्या एक लाख १५ हजार ७९८ झाली. दिवसभरात एक हजार ६ रुग्ण बरेही झाले. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या एक लाख दोन हजार ७९४ वर पोचली आहे. जिल्ह्यातील मृत्युदर अद्यापही चिंतेची बाब आहे. गेल्या २४ तासांत आणखी २१ रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे बळींचा आकडा दोन हजार ५८ झाला आहे.

जळगावात दिलासा

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराला दिलासा मिळाला आहे. शनिवारी शहरात १६५ नवे रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे दिवभरात तब्बल २३४ रुग्ण बरे झाले. तर एक ८६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

हेही वाचा: हजारो रुपये किलोने बियाण्यांची खरेदी,आणि भाव मात्र ४ ते ५ रुपये किलो !

अन्य ठिकाणचे रुग्ण असे

जळगाव ग्रामीण ३२, भुसावळ ९७, अमळनेर ४१, चोपडा ११०, पाचोरा६०, भडगाव २७, धरणगाव ३०, यावल ३६, एरंडोल १०१, जामनेर ६३, रावेर १०४, पारोळा ३७, चाळीसगाव ४३, बोदवड २२, मुक्ताईनगर ७३, अन्य जिल्ह्यातील ७.

संपादन- भूषण श्रीखंडे