esakal | कोवॅक्सिनचा घोळ! 6 कोटी उत्पादन, 2 कोटी वापरले; इतर लशी गेल्या कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

covaxin

देशात लसीकरणाला (vaccination) सुरुवात झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी हाच एकमेव आणि प्रभावी मार्ग असल्याचं तज्त्रांचं मत आहे. भारतात दोन लशींच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे.

कोवॅक्सिनचा घोळ! 6 कोटी उत्पादन, 2 कोटी वापरले; इतर लशी गेल्या कुठे?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात लसीकरणाला (vaccination) सुरुवात झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी हाच एकमेव आणि प्रभावी मार्ग असल्याचं तज्त्रांचं मत आहे. भारतात दोन लशींच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिस (bharat biotech) लशीचा समावेश आहे. कोविशिल्डपेक्षा कोवॅक्सिनचा वापर कमी प्रमाणात होत आहे. अशात कोवॅक्सिन लशीबाबत वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलंय. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात 2.1 कोटी कोवॅक्सिन लशीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. पण, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सध्या 6 कोटी लस उपलब्ध असायला हव्या होत्या. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतोय की उर्वरित लशी गेल्या कुठे? हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीने याबाबत भाष्य करण्यास टाळलं आहे. (6 crore shots ready 2 crore given Where are the rest Covaxin bharat biotech puzzle)

नेमका घोळ कुठं होतोय?

कंपनीचे सीएमडी कृष्णा ईला यांनी 20 एप्रिलला ऑन रिकॉर्ड दिलेल्या माहितीनुसार 1.5 कोटी डोस मार्चमध्ये उत्पादित करण्यात आले. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत 2 कोटी डोस निर्माण करण्यात आले. त्यानंतर मे महिन्यात 3 कोटी डोस निर्माण होतील, असं त्यांनी सांगितलं होतं. समजा मे महिन्यात नियोजनाप्रमाणे लशींचे उत्पादन झाले नाही. तरी मार्च आणि एप्रिल महिन्यातील मिळून 3.5 कोटी लस आणि मे महिन्यात समजा 2 कोटी लशींचे उत्पादन झाले. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

हेही वाचा: दिलासादायक! दुसरी लाट ओसरतेय, 24 तासात 1.86 लाख नवे रुग्ण

केंद्राने 24 मे रोजी सुप्रीम कोर्ट आणि केरळ हायकोर्टाला दिलेल्या माहिनीनुसार भारत बायोटेक महिन्याला 2 कोटी लशींचे उत्पादन करत आहेत. हे सर्व लक्षात घेता आपल्याला म्हणता येईल की, कोवॅक्सिन लशीच्या 5.5 कोटी लशींचे आतापर्यंत उत्पादन झाले आहे. याशिवाय लसीकरण सुरु होण्याआधी 5 जानेवारीला कृष्णा ईला यांनी म्हटलं होतं की, कंपनीकडे 2 कोटी लशींचा साठा आहे. यामुळे एकूण संख्या होते 7.5 कोटी. त्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील उत्पादन 0.5 कोटी गृहित धरल्यास आतापर्यंत लशीचे एकूण उत्पादन 8 कोटी झाले.

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

भारत बायोटेकच्या लशीची इतर देशांना निर्यात करण्यात आली आहे. भारताने लस डिप्लोमसी अंतर्गत आतापर्यंत कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लशीचे 6.6 कोटी डोस निर्यात केले आहेत. यातील जास्त प्रमाणात सीरमच्या कोविशिल्डची निर्यात करण्यात आली आहे. तरी समजा कोवॅक्सिनचे 2 कोटी डोस निर्यात करण्यात आले. याचा अर्थ कंपनीकडे किमान 6 कोटी लशीचे डोस शिल्लक राहणे आवश्यक होते. यातील केवळ 2.1 कोटी लस भारतात वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशात तुटवडा जाणवत असताना इतर लशी गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी केंद्र सरकार आणि भारत बायोटेकने उत्तर देणं अपेक्षित आहे.

loading image