Delhi Violence : दिल्लीत हिंसाचार सुरुच; 7 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

- आंदोलन पेटले; गाड्यांना आगी लावल्या, पोलिस उपायुक्त जखमी 

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीच्या मौजपूर आणि जाफराबाद भागात सीएए समर्थक आणि विरोधी गटात उसळलेल्या हिंसाचारात पोलिस कॉन्स्टेंबल ठार झाला तर अन्य एका घटनेत पोलिस उपायुक्तांसह अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला तर जखमींची संख्या 76 वर गेली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मौजपूर भागात हिंसाचार उसळला. सीएए समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. चांदबाग, भजनपुरा भागातही आंदोलनकर्त्यांनी काही ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्न केला. मौजपूर मेट्रो स्थानकाच्या नजीक कबीरनगर भागात हिंसा उसळल्याचे पोलिसांनी सांगितले.

ट्रम्प म्हणतात, दहा वर्षांत भारतातील गरिबी हटणार

दरम्यान, दिल्ली मेट्रोने परिस्थिती तणावपूर्ण असल्याने जाफराबाद आणि मौजपूर-बाबरपूर स्थानकावर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद केले. त्यामुळे या स्थानकावर मेट्रो थांबल्या नाहीत. 

कलम 144 लागू

दिल्लीच्या हिंसाचारात 76 जण जखमी झाले आहेत. त्यानंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर येथे जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच जाफ्राबाद, मौजपूर-बाबरपूर, गोकुळपुरी, जोहरी एन्क्लेव्ह आणि शिव विहार येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

दिल्लीतील हिंसक निदर्शने जाणीवपूर्वक? ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे हिंसाचार घडविल्याची शक्यता!

केजरीवाल यांनी बोलावली बैठक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या हिंसाचारानंतर आपल्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 Died and 76 injured in Delhi violence