दिल्लीतील हिंसक निदर्शने जाणीवपूर्वक? ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे हिंसाचार घडविल्याची शक्यता!

सकाळ न्यूज नेटवर्क 
Monday, 24 February 2020

मौजपूरमधील घटनेनंतर हिंसा भडकण्याची शक्‍यता असलेल्या जाफराबाद, सिलमपूर, मौजपूर, गौतमपुरी, भजनपुरा, चांदबाग, मुस्तफाबाद, वझिराबाद, शिवविहार या भागामध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा सुरू असताना राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या मौजपूर भागात नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे जाणीवपूर्वक हा हिंसाचार घडविल्याची शक्‍यात गृह खात्याने पडताळून पाहणे सुरू केले असून, हिंसाचारग्रस्त भागामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीच्या मौजपूर भागात नागरिकत्व कायद्याविरोधातील निदर्शनांना हिंसाचाराचे गालबोट लागले असून, दिल्ली पोलिसांच्या एका हेडकॉन्स्टेबलला हिंसाचारामुळे प्राण गमवावे लागले; तर शाहदरा भागातील डीसीपीदेखील गंभीर जखमी झाले. हिंसाचार आटोक्‍यात न आल्याने या भागात निमलष्करी दलांना पाचारण करण्यात आले.

- कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवला जाणार

गृह खात्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ईशान्य दिल्लीत घडलेला हा हिंसाचार डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर जाणीवपूर्वक घडविण्यात आल्याचे दिसते. दिल्ली पोलिसांची यंत्रणा तसेच गृह खात्यानेही या घटनाक्रमावर बारकाईने लक्ष ठेवले असून, पोलिस आयुक्त नियंत्रण कक्षातून मौजपूर भागातील स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे गृह सचिव अजय भल्ला यांनी सांगितले. 

मौजपूरमधील घटनेनंतर हिंसा भडकण्याची शक्‍यता असलेल्या जाफराबाद, सिलमपूर, मौजपूर, गौतमपुरी, भजनपुरा, चांदबाग, मुस्तफाबाद, वझिराबाद, शिवविहार या भागामध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

- Women's T20 World Cup : 'छोरीयां छोरोंसे कम नहीं'; भारताचा बांग्लादेशवर विजय!

दरम्यान, गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी हैदराबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिल्लीतील हिंसाचारावर कडवट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान जाणीवपूर्वक हिंसाचार भडकावून जगभरात भारताची प्रतिमा मलिन करण्याचे हे षड्‍यंत्र असल्याचा आरोप केला; तसेच हेड कॉन्स्टेबलच्या मृत्यूची जबाबदारी राहुल गांधी, औवेसी घेतील काय, असा सवालही केला.

- कर्ज फिटलं साहेब, लेकीच्या लग्नाला या; शेतकऱ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

दोन महिन्यांपासून दिल्लीच्या शाहीनबागेत आंदोलन सुरू असून, सरकारने संयमाने परिस्थिती हाताळली आहे. पोलिस बळाचा वापर केलेला नाही; पण शांततेत आंदोलन करण्याऐवजी आज हिंसाचाराचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. याप्रकरणी गंभीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will take stern action against perpetrators of Delhi violence says MoS Home Reddy