७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या, ऊसाच्या शेतात सापडला मृतदेह

Rape Crime news
Rape Crime newsSakal

नवी दिल्ली : सात वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Minor Girl Physical Abused) करण्यात आला. नराधम इतक्यावरच थांबले नाहीतर त्यांनी तिची हत्या करून मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून दिला. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद (Moradabad Uttar Pradesh Crime) येथे ही घटना घडली असून याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rape Crime news
बलात्कार प्रकरणात एकास पोलिस कोठडी

पीडित मुलगी ही तीन भावंडांपैकी सर्वात मोठी होती. तिचे वडील भाजीपाल्याचा धंदा करतात. बुधवारी संध्याकाळी ती घराजवळ खेळत असताना तिचे अपहरण करण्यात आले. मुलगी घरी दिसत नसल्याने आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांच्या दोन टीम तिला शोधण्यासाठी रवाना झाल्या. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. शुक्रवारी सकाळी एक शेतकरी शेतात गेल्यानंतर त्याला काहीतरी सडल्याचा वास आला. त्यामुळे त्याने शेतात शोध घेतला असता ऊसाच्या शेतात सात वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या मुलीच्या शरीरावर अनेक जखमा असून तिच्या बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानंतर दिली. आम्ही संशयितांना ताब्यात घेतले असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावू, असं पोलिस अधीक्षक विद्या सागर मिश्रा यांनी सांगितले.

माझ्या मुलीला न्याय द्या - पीडितेची आई

मुलगी शोधूनही सापडली नाही. त्यामुळे दोन दिवस झोप आली नाही. माझी मुलगी घरी परत येईल याची वाट पाहत होते. पण, शुक्रवारी तिचा मृतदेह सापडल्याची बातमी आली. माझ्या मुलीवर बलात्कार केला. तिला न्याय मिळवून द्या, अशी मागणी करत पीडितेच्या आईनं हंबरडा फोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com