बाळाला जन्म देणाऱ्या 17 वर्षाच्या मुलीवर आईच्या चार प्रियकरांकडून बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chennai Crime News

मुलीवर किमान चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचं उघड झालंय.

17 वर्षाच्या मुलीवर आईच्या चार प्रियकरांकडून बलात्कार

चेन्नई : एग्मोर येथील शासकीय प्रसूती रुग्णालयात (Government Maternity Hospital in Egmore) सोमवारी एका 17 वर्षीय मुलीची प्रसूती झाली असून ती बलात्कार पीडित असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर किमान चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचं उघड झालं असून या सर्वांचं तिच्या आईसोबत प्रेमप्रकरण होतं, असं स्पष्ट झालंय.

या आरोपींवर वॉशरमनपेठ महिला पोलिसांनी (Washermenpet Women Police) गुन्हा दाखल करून मुलीची आई आणि तिच्या 51 वर्षीय प्रियकराला अटक केलीय. या गुन्ह्याशी संबंधित आणखी दोन जणांचा शोध सुरू करण्यात आलाय. कोडुंगैयुरजवळील (Kodungaiyur) मीनांबाल नगरात (Meenambal Nagar) राहणाऱ्या आरोपीचं दुराईराज असं नाव असून, त्याचे बलात्कार पीडितेच्या आईसोबत गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. भेटीदरम्यान दुराईराज हा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा. अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म दिल्यानंतर अत्याचार उघडकीस आला आणि रुग्णालयानं महिला पोलीस ठाण्यात ही माहिती दिली.

पोलिसांच्या पथकानं मुलीचा जबाब नोंदवलाय. या चौकशीदरम्यान, मुलीनं पोलिसांना सांगितलं, की दामोदरन नावाच्या एका व्यक्तीनं तिचे लैंगिक शोषण केले होते, जो तिच्या आईसोबतही होता. या मुलीवर दुराईराज, बशीर, जमाल आणि इतरांसह आणखी काही लोकांनी बलात्कार केल्याची तक्रार आहे. मुलीच्या आईच्या उपस्थितीत, तसेच अनुपस्थितीत या घटना घडल्या आहेत. रुग्णालयानं दिलेल्या तक्रारीच्या आधारे वॉशरमनपेठ महिला पोलिसांनी दुराईराज आणि मुलीच्या आईला अटक केली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीय. दरम्यान, चेन्नई पोलिसांनी (Chennai Police) थिरुवोटीयुर येथे अल्पवयीन मुलीला गर्भधारणा केल्याप्रकरणी एका कुलीला अटक केलीय. पोलिसांनी सांगितलं, की थिरुवोट्टियूरमधील पूंगावनम नगरातील विजयकुमारचे (वय 24) एका 16 वर्षांच्या मुलीशी संबंध होते आणि घरच्यांचा विरोध असतानाही त्यानं तिच्याशी लग्न केलं. ती गरोदर राहिल्यानं तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिरुवोट्टीयुर महिला पोलिसांनी तपासानंतर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून विजयकुमारला कोठडीत पाठवलंय.

टॅग्स :Crime NewsChennai