भाजप आमदाराने मुलाच्या लग्नात वाजवले ७० लाखांचे फटाके, शाही लग्नसोहळ्यातील VIDEO VIRAL

इंदौरमध्ये भाजप आमदाराच्या मुलाच्या लग्नात ७० लाखांचे फटाके वाजवण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून विरोधकांनी यावर टीकाही केली आहे.
BJP MLA Spends 70 Lakh on Fireworks at Son Wedding Video Goes Viral

BJP MLA Spends 70 Lakh on Fireworks at Son Wedding Video Goes Viral

Esakal

Updated on

इंदौरमध्ये भाजप आमदाराच्या मुलाचा लग्नसोहळा सध्या चर्चेत आला आहे. या लग्नसोहळ्यात भव्य सेट, सजावट करण्यात आली होती. याशिवाय लग्न सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसच्या नेत्यांनीही या लग्नासाठी हजेरी लावली होती. दरम्यान, लग्नसोहळ्यात फटाक्यांच्या आतषबाजीची चर्चा सर्वत्र होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com