धक्कादायक! लॉकडाऊनच्या काळात तब्बल 'इतके' टक्के लघू उद्योग बंद; स्पोक्टोचे सर्वेक्षण 

small business
small business

मुंबई; कोव्हिड संकटाचा देशभरातील उद्योग, संस्था आणि समाजावार गंभीर परिणाम झालेला आहे.  वित्तीय उदासीनता, शून्य महसूल निर्मितीमुळे देशातील 78%  लघूउद्योजकांना आपले कामकाज बंद करावे लागले आहे. डेटा विश्लेषक-आधारित बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी स्पोक्टोने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

मुंबई, पुणे, नवी दिल्ली, बंगळुरू सारख्या 185 शहरांमधील खातेदारांचे विचार व दृष्टीकोन समाविष्ट असणा-या अभ्यासातून काही ठळक बाबी निदर्शनास आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे  59% ग्राहकांचे उत्पन्नात नुकसान झाले आहे. तर केवळ 4 टक्के ग्राहकांच्या उत्पन्नावर कुठलाही परिणाम झाला नाही. देशभरात  जवळपास 34 % कर्मचा-यांनी आपल्या नोक-या गमावल्या आहेत.

दरम्यानच्या काळात पैशांची चणचण निर्माण झाली असून दैनंदिन गरजा भागविण्याकरिता सुमारे 56 टक्के ग्राहकांनी वैयक्तिक कर्ज घेतले आहे. तर गृहकर्ज घेणा-या ग्राहकांची संख्या 23 टक्के आहे. यानंतर व्यावसायिक कर्ज   घेणा-या ग्राहकांचा (17%), कार लोन (16%), दुचाकी कर्ज (15%), इतर कर्ज (5%) यांचा क्रमांक लागतो. एकूण खातेदारांपैकी 76 टक्के लोकांनी ईएमआयमध्ये 50,000 रुपयांची लहान कर्जे घेतली आहेत. परतफेड करण्यात गडबड झालेल्यामध्ये सुरक्षितपेक्षा असुरक्षित कर्जांचे प्रमाण जास्त आहे.

पुढच्या वर्षभराचा विचार केल्यास 38 टक्के ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या कर्जाची गरज भासणार नसून 37  टक्के ग्राहकांना मात्र लग्न, शिक्षण यांसारख्या वैयक्तिक खर्चकरिता कर्जाची आवश्यकता असणार आहे. 16 टक्के ग्राहकांना गृहकर्जाची आवश्यकता भासणार असून स्वतःचे वाहन विकत घेण्याकरिता 9 टक्के ग्राहकांना कर्जाची गरज लागणार आहे.

78 टक्के ग्राहकांनी इनिशिअल मोरॅटोरिअम कालावधी (मार्च ते मे) ची निवड केली. म्हणजे जवळपास 22 टक्के  ग्राहकांनी मोरॅटोरिअम ऑफरची स्विकारली नाही. निवड केली नाही. मोरॅटोरिअमविषयी बँकांकडून मिळालेली अपूर्ण माहिती याबद्दल ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे, असंही या अहवालातून समोर आले आहे. 

78 percent smal; business shut down in lockdown 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com