esakal | गुडांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार, अधिकाऱ्यासह 8 जण हुतात्मा

बोलून बातमी शोधा

uttar Pradesh, Kanpur, UP Police

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरच्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या पोलिसांना वाहिली श्रद्धांजली

गुडांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार, अधिकाऱ्यासह 8 जण हुतात्मा
sakal_logo
By
वृत्तसंस्था

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कुख्यात गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या तुकडीवर हल्ला करण्यात आला. गुंडांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्यासह 8 पोलिस हुतात्मा झाले आहेत. कानपूर येथील चौबेपूर पोलिस स्थानकाच्या परिसरात गुरुवारी रात्री उशीराने केलेल्या कारवाईदरम्यान पोलिस-गुंडांच्यात चकमक झाली. या गोळीबारात आणखी चार पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या गुंडापैकी एकाचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरच्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली असून याप्रकरणातील चौकशी अहवालासह आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे आदेश दिले आहेत.  

रशियाकडून मिळणार सुखोई अन्‌ मिग विमाने;संरक्षण साहित्य खरेदी समितीकडून मान्यता

विकास दुबे या कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री चौबेपुरमधील बिकरू गावात दाखल झाली होती. यावेळी घराच्या छतावरुन पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यात पोलिस अधिकारी बिल्होर देवेंद्र मिश्रा यांच्यासह 8 जण हुतात्मा झाले. या घटनेनंतर गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर हल्ला करुन घटनास्थळावरुन पळ काढलेल्या गुंडांसोबत पोलिसांची पुन्हा एकदा चकमक झाली आहे. घटनास्थळापासून जवळपास 4 किमी अंतरावर असलेल्या जंगल परिसरात दोघांना कंठस्थान घालण्यात आले. खात्मा करण्यात आलेल्या गुंडाकडून हत्यार जप्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 

देशातील स्मारके होणार 6 जुलैपासून खुली; लाल किल्ल्यासह 3400 स्मारकांचा समावेश

विकास दुबे हा बिठूरच्या शिवली पोलिस हद्दीत असलेल्या बिकरु गावातील मुळचा रहिवासी आहे. 2001 मध्ये त्याने भाजपच्या राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळालेल्या संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. या घटनेमुळे एकच खळबळ माजली होती. कुख्यात गुंड असलेल्या विकास दुबेचं घर हे एखाद्या किल्ल्याप्रमाणे आहे. त्याच्या परवानगीशिवाय घरात प्रवेश करणे खुपच कठिण आहे. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर