8th Pay Commission DA and HRA calculation
esakal
8th Pay Commission implementation date : केंद्र सरकारी कर्मचारी ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आयोगाला आपल्या शिफारशी केंद्र सरकारकडे सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र, या मुदतीत अहवाल सादर होण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहवाल उशिरा सादर झाल्यास त्याचा थेट परिणाम वेतनवाढीच्या अंमलबजावणीवर, तसेच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या थकबाकीवर होऊ शकतो.