ड्रग्ज-दारूमुळं वर्षभरात 9000 जणांच्या आत्महत्या; महाराष्ट्र अव्वल, तर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drugs

सन 2020 मध्ये अंमली पदार्थांचं सेवन आणि दारूच्या व्यसनामुळं होणाऱ्या आत्महत्यांच्या संख्येत मोठी वाढ झालीय.

ड्रग्ज-दारूमुळं वर्षभरात 9000 जणांच्या आत्महत्या

सन 2020 मध्ये अंमली पदार्थांचं (Drugs) सेवन आणि दारूच्या (Alcohol) व्यसनामुळं होणाऱ्या आत्महत्यांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. अंमली पदार्थ आणि दारूचं व्यसन करणाऱ्यांनी आत्महत्या केल्याची 9000 प्रकरणं समोर आली आहेत. म्हणजेच, दर तासाला किमान एक व्यक्ती आत्महत्या करत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये अशा 43 टक्क्यांहून अधिक प्रकरणं नोंदली गेली आहेत.

मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं, की दारू आणि ड्रग्जमुळं लोकांची मानसिक स्थिती बिघडते. शिवाय आर्थिक संकट, कौटुंबिक समस्यांमुळं अनेक व्यक्ती हा मार्ग निवडतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) National Crime Records Bureau आकडेवारीनुसार, ड्रग्ज आणि अल्कोहोलमुळं गेल्या वर्षभरात 7,860 आत्महत्या झाल्या आहे. त्यात 2020 मध्ये 17 टक्क्यांनी वाढ झालीय.

हेही वाचा: Election 2021 : दहा जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात

सन 2019 मध्ये देशभरातील 1.3 लाखांहून अधिक आत्महत्या प्रकरणांपैकी 5.6% हे अंमली पदार्थांचं सेवन आणि अल्कोहोलच्या सेवनामुळं झालेल्या आत्महत्यांचं प्रमाण होतं. तसेच 2020 मध्ये 1.5 लाखांहून अधिक आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये हा आकडा 6% होता. याच वर्षात दारू आणि अंमली पदार्थांच्या सेवनामुळं झालेल्या आत्महत्यांच्या 9,169 घटनांपैकी 3,956 प्रकरणं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील होती. मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार, 2015 पासून महाराष्ट्रानं या यादीत अव्वल स्थान पटकावलंय, तर कर्नाटकातील प्रकरणांमध्येही सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं हे राज्य 2018 पासून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: आमदार शिंदे-रांजणे यांच्यात 'हाय होल्टेज' लढत

5 वर्षात 40 हजार मृत्यू

2015 ते 2020 दरम्यान ड्रग्ज आणि अल्कोहोलमुळं झालेल्या आत्महत्यांत जवळपास 40,000 मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक व्यतिरिक्त मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्येही गेल्या काही वर्षांत सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. 2020 मध्ये या राज्यांमध्ये 7,356 म्हणजे, ड्रग्स आणि अल्कोहोलच्या सेवनामुळं आत्महत्या झाल्याची नोंद आहे. गेल्या 5 वर्षांत अशा प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून 2015 मध्ये केवळ 3,670 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

loading image
go to top